Pahalgam Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. मात्र या गंभीर प्रसंगी, काही स्थानिक मुस्लिम नागरिकांच्या चेहऱ्यावर असलेल्या हास्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
शर्मनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल-
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पहलगाममधील (Pahalgam Attack) काही नागरिक हल्ल्याबाबत मीडिया प्रतिनिधींशी संवाद साधताना दिसतात. या संवादादरम्यान, एका व्यक्तीने हल्ल्यामुळे दु:ख व्यक्त केलं असतानाच त्याच्या मागे बसलेला दुसरा व्यक्ती हसताना दिसतो. या हास्याने अनेकांचे रक्त उकळले असून, देशातील सामान्य नागरिक यामुळे संतप्त झाले आहेत.
Muslim men in the background are smiling, clearly happy after eliminating Kafir Hindus.
Hindu-Muslim Bhaichara is the biggest joke ever!! #Pahalgam pic.twitter.com/aR5ZuxbuwK
— BALA (@erbmjha) April 22, 2025
हा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. लोक प्रश्न विचारत आहेत की एवढ्या मोठ्या राष्ट्रीय शोक प्रसंगी हसण्यासारखे नेमकं काय होतं? या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला असून, दहशतवादी थेट पर्यटकांना त्यांच्या धर्मावरून लक्ष करत होते, हे देखील समोर आले आहे.
सुरक्षाव्यवस्था अधिक कठोर-
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील (Pahalgam Attack) बैसरन परिसरात झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या गटावर थेट गोळीबार करत २६ जणांचा जीव घेतला, तर १२ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षाबळांकडून विशेष सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि सैन्य यंत्रणा सतर्क असून, यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी गुप्तचर यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली असून, देशवासी या घटनेमुळे व्यथित आणि रोषित आहेत.






