“मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात…”, मोदींच्या वक्तव्यावर ओवैसींचा पलटवार

On: April 29, 2024 6:05 PM
narendra modi
---Advertisement---

Owaisi | गेल्या आठवड्यात राजस्थानमधील बांसवाडा येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटलं आहे की, लोकांची संपत्ती तसेच माता-भगिनींचे सोने आणि मंगळसूत्रही हिसकावून घेऊन ज्यांना अधिक मुलं आहेत त्यांना वाटून टाकतील. त्यावेळी मोदींनी मुस्लीम असं नावही घेतलं होतं.

मोदींच्या या विधानानंतर काँग्रेससह विरोधकांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही यावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

काय म्हणाले ओवैसी?

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत ओवैसींनी (Owaisi) मोदी आणि अमित शाहा यांच्यावर निशाणा साधला. ओवैसी म्हणाले की, मुस्लीम जास्त मुलांना जन्म देतात असं मोदी म्हणाले. मात्र नरेंद्र मोदी यांना सहा भाऊ आहेत. तर अमित शहा यांना सहा बहिणी आहेत. एवढंच नाही तर, राष्ट्रीय संव्यसेवक संघाच्या प्रमुख्यांना 10 ते 12 बहिण भाऊ आहेत.

मुस्लीम समाजातील जन्मदराचा आलेख हा घसरता असल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे असंही ओवैसी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे द्वेष पसरण्याचं काम करत आहेत. द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुसलमान अधिक मुलं जन्माला घालतात, अशी भीती पसरवली जात आहे. मात्र केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लीम लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला जराही संकोच वाटत नाही.

मुस्लीम बहुसंख्य होणार नाही-

पुढे ओवैसी (Owaisi) म्हणाले की, या देशात मुस्लीम कधीच बहुसंख्य होणार नाहीत. यावेळी ओवैसींनी काही प्रश्न देखील उपस्थित केले. ओवैसी म्हणाले की, नरेंद्र मोदीजी अजून किती काळ तुम्ही मुस्लिमांची भिती दाखवत राहणार?. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये केलेल्या ‘घुसखोर’ या उल्लेखावरुनही ओवैसींनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 कोटी भारतीय मुस्लिमांना घुसखोर म्हणतात. तुम्ही घुसखोर आहात का?, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.

News Title : Owaisi On PM Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या-

बँकेचे कामे उरकून घ्या; मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार

नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट!

नरेंद्र मोदींचा रुबाब वाढवणार दिग्विजय पगडी, मुरलीधर मोहोळांनी सांगितली खासियत

अमिरची मुलगी जगतेय सामान्य जीवन; नुपूरच्या घराचा व्हिडीओ व्हायरल

राजकारणात नवा ट्विस्ट! शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता म्हणतोय मी कुठेही जायला तयार

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now