पाकचे संरक्षण मंत्री मुलाखतीत स्वतःच तोंडावर पडले, अँकरने झाप झाप झापलं

On: May 8, 2025 12:03 PM
Khawaja Asif
---Advertisement---

Operation Sindoor | भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. यानंतर पाकिस्तानने (Pakistan) भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत स्वतःच तोंडावर पडले.

विमान पाडण्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारताची पाच विमाने पाडल्याचा दावा केला. मात्र, ‘सीएनएन’ (CNN) या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना या दाव्याबद्दल पुरावे मागितले असता, ते गडबडले. त्यांनी पुराव्याऐवजी सोशल मीडियाचा (Social Media) आधार घेण्याचा प्रयत्न केला.

“हे सर्व सोशल मीडियावर (Social Media) आहे, भारतीय सोशल मीडियावर (Indian Social Media) आहे, आमच्या नाही,” असे उत्तर आसिफ (Asif) यांनी दिले. विमानांचे अवशेष काश्मीरमध्ये (Kashmir) पडले असून ते भारतीय सोशल मीडियावर (Indian Social Media) दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. यावर, अँकरने (Anchor) त्यांना, “माफ करा, पण आम्ही तुम्हाला सोशल मीडियावरील (Social Media) मजकुराबद्दल विचारले नाही,” असे सुनावत त्यांची बोलती बंद केली.

चिनी उपकरणांचा वापर? पुन्हा गोंधळ आणि कबुली

पुढे, विमाने कशी पाडली आणि कोणती उपकरणे वापरली, या प्रश्नावरही आसिफ (Asif) गोंधळले. त्यांना वापरलेल्या विमानांची माहिती देता आली नाही. भारताचे (India) विमान पाडण्यासाठी चिनी (Chinese) उपकरणांचा वापर केला का, असे विचारल्यावर ते म्हणाले, “नाही, चिनी (Chinese) उपकरणे नाहीत. आमच्याकडे चिनी (Chinese) विमाने आहेत, JF-17 आणि JF-10. ती आता पाकिस्तानातच  तयार होतात. जर भारत (India) फ्रान्सकडून (France) विमाने घेऊ शकतो, तर आम्ही चीन (China), रशिया (Russia) किंवा अमेरिकेकडून (USA) का नाही घेऊ शकत?”

याच मुलाखतीदरम्यान, एप्रिलमधील त्यांची एक जुनी व्हायरल क्लिपही चर्चेत आली, ज्यात त्यांनी पाकिस्तानने  अमेरिका (USA) आणि ब्रिटनसह (Britain) पाश्चिमात्य देशांसाठी दहशतवादी गटांना पाठिंबा आणि प्रशिक्षण दिल्याची कबुली दिली होती. “गेल्या तीन दशकांपासून आम्ही हे घाणेरडे काम करत होतो. ती एक चूक होती आणि आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागला,” असे ते ‘स्काय न्यूज’च्या (Sky News) यालदा हकीम (Yalda Hakim) यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. दरम्यान, भारताच्या (India) प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) पाकिस्तानचा विमाने पाडल्याचा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तान २०२१ मधील मिग-२१ (MiG-21) क्रॅशचे जुने फोटो वापरून खोटा दावा करत असल्याचे पीआयबीने (PIB) म्हटले आहे.

Title : Pak Minister Fumbles on Jet Claims

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now