कांद्यानं उडवला हाहाकार!; भाव ऐकाल तर म्हणाल, आधी उगाच विकला???

On: October 31, 2023 8:39 PM
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पीक म्हणजे कांदा… महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हे पीक पिकवत असले तरी फारच कमी वेळा शेतकऱ्यांना चांगला बाजार मिळतो. कांदा दरवर्षी कुणाला ना कुणाला तरी रडवतो. यंदा कांद्यानं ग्राहकांवर रडण्याची वेळ आणली आहे. सध्या उत्तर भारतापासून ते थेट दक्षिण भारतापर्यंत कांद्याने खळबळ उडून दिली आहे.

काय आहे कांद्याचा भाव?

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये कांद्याच्या भावानं मोठी उचल खाल्ली आहे. काद्यांने थेट 70 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर देशातील उर्वरित 6 राज्यांमध्ये कांद्याची किंमत 60 रुपयांच्या पुढे पोहचली आहे. कांद्याची भाववाढ झाल्याने केंद्र सरकारने सुद्धा या प्रकरणाची दखल घ्यायला सुरुवात केली आहे. (बातमीच्या शेवटी वाचा कुठल्या राज्यात किती भाव?)

कांदा वाटतं तितकं सोपं पीक नाही. या कांद्याने याआधी अनेक सरकारांना घाम फोडला आहे. कांद्यामुळे एखादं सरकार सुद्धा कोसळू शकतं, इतपत परिस्थिती तयार होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारनं तात्काळ याची दखल घेतली असून उपाययोजना सुरु केल्या असल्याची माहिती आहे.

सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत?

एखाद्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढले की त्यावर उपाययोजना करण्याचं काम सरकार करतं. त्यामुळे कांद्याची किंमती वाढल्याने सरकारने देखील एक मोठं पाऊल उचललं आहे. कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉक बाजारात आणला आहे. सरकारने हे मोठं पाऊल उचललं असलं तरी त्याचा थेट परिणाम अद्याप बाजारात दिसलेला नाही.

सरकारने उपाययोजना केल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये कांद्याच्या किंमती 70 रुपये अथवा त्यापेक्षा जास्त आहेत. किरकोळ बाजारात तर हा भाव 80 रुपये किलोवर पोहचल्याचं चित्र आहे, तर काही राज्यांमध्ये हा भाव 60 रुपयांवर घरात पोहचला आहे.

खालील 8 राज्यांमध्ये कांद्याचा भाव सर्वाधिक

  1. दिल्लीत कांद्याचा दर 78 रुपये किलो आहे.
  2. गुजरातमध्ये कांद्याचा भाव 75 ते 80 रुपये किलोपर्यंत पोहचतो.
  3. दक्षिण भारतात पुद्दुचेरीमध्ये कांद्याचा भाव 70 रुपयांवर पोहचला आहे.
  4. गोव्यामध्ये कांद्याचा भाव 67.5 रुपये आहे.
  5. तामिळनाडूमध्ये काद्यांची किंमत 65.86 रुपये प्रति किलो आहे.
  6. केरळमध्ये कांद्याचा भाव 65.57 रुपये आहे.
  7. मेघालयात काद्यांचा दर 64.6 रुपये आहे.
  8. दादरा नगर हवेलीतही कांद्याचा भाव 63 रुपयांवर पोहोचला आहे.
  9. अंदमान निकोबारमध्ये कांद्याचा दर 60 रुपयांपेक्षा अधिक आहे.

महाराष्ट्रात काय आहे परिस्थिती- महाराष्ट्रात पण कांदा 60 रुपयांच्या घरात पोहचला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now