OnePlus Nord CE 6 Lite | भारतीय स्मार्टफोन बाजारात लवकरच एक नवीन मिड-रेंज डिव्हाइस दाखल होणार आहे. वनप्लस (OnePlus) कंपनीचा आगामी OnePlus Nord CE 6 Lite स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याच्या फीचर्सबाबत माहिती समोर आली आहे. मोठी बॅटरी, दमदार डिस्प्ले आणि परफॉर्मन्स या कारणांमुळे हा फोन चर्चेत आला असून त्याची किंमतही 25 हजार रुपयांच्या आत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅमेरा आणि डिस्प्लेची खास वैशिष्ट्ये :
लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE 6 Lite या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यातील मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेल क्षमतेचा असण्याची शक्यता आहे. या कॅमेऱ्याला ओआयएस (OIS) सपोर्ट मिळण्याची शक्यता असल्याने फोटो आणि व्हिडिओ अधिक स्थिर आणि स्पष्ट येण्यास मदत होईल. याशिवाय दुय्यम कॅमेराही देण्यात येईल, मात्र त्याबाबत सध्या अधिक तपशील उपलब्ध नाहीत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
या फोनमध्ये सुमारे 6.7 इंच आकाराचा मोठा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याला 120Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो, ज्यामुळे स्क्रीन स्क्रोलिंग आणि अॅनिमेशन अधिक स्मूथ अनुभव देता येईल. मात्र डिस्प्ले AMOLED असेल की नाही याबाबत कंपनीकडून अजून अधिकृत पुष्टी झालेली नाही. परफॉर्मन्सच्या दृष्टीने या डिव्हाइसमध्ये मीडियाटेक डायमेंशन 6300 (MediaTek Dimensity 6300) प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यासोबत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध असण्याची शक्यता आहे. हा कॉम्बिनेशन रोजच्या वापरासाठी आणि हलक्या मल्टीटास्किंगसाठी योग्य मानला जातो.
OnePlus Nord CE 6 Lite | 7000mAh बॅटरी आणि अपेक्षित किंमत :
या स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची प्रचंड क्षमतेची बॅटरी. रिपोर्ट्सनुसार, OnePlus Nord CE 6 Lite मध्ये तब्बल 7000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात येऊ शकते. इतकी मोठी बॅटरी असल्यामुळे वापरकर्त्यांना दीर्घकाळ बॅकअप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारंवार चार्जिंग करण्याची गरजही कमी भासेल. या फोनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा दिली जाऊ शकते, मात्र त्याचा वेग मिड-रेंज सेगमेंटमध्ये सामान्य असू शकतो. बॅटरी क्षमतेमुळे हा फोन इतर मिड-रेंज स्मार्टफोनना चांगली टक्कर देऊ शकतो.
लॉन्चिंगबाबत बोलायचे झाल्यास, वनप्लस (OnePlus) कंपनी 7 एप्रिल 2026 रोजी OnePlus Nord 6 हा फोन भारतात सादर करणार आहे. त्यानंतर साधारण एक महिन्याने म्हणजे मे 2026 च्या सुमारास OnePlus Nord CE 6 Lite बाजारात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किंमतीबाबत बोलायचे झाले तर या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे 23,000 रुपयांच्या आसपास असू शकते. या किंमतीत 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






