…असा सुरु झाला ड्रग्सचा कारखाना; ‘इतक्या’ लाखांमध्ये झाला होता सौदा

On: October 22, 2023 6:14 PM
---Advertisement---

पुणे | ललित पाटील प्रकरणी (Lalit Patil) रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 15 दिवसांपासून फरार असलेल्या ललितला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतलं. त्यानंतर ललितने त्याच्यावरचे अनेक आरोप देखील फेटाळले. दरम्यान ललित पाटीलबद्दल अणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीये.

येरवडा (Yerwada) कारागृहात असलेला ललित पाटील याचा ड्रग्स (Drugs) कारखाना उभारण्याचा प्लॅन कारागृहातच घडला. सुमारे 35 लाख रुपये देऊन त्याने ड्रग्स कसं बनवावं? हे शिकून घेतलं त्यानंतर त्यांनी नाशिक (Nashik) येथे ड्रग्सचा कारखाना सुरु करुन राज्यात अन् देशात ड्रग्सचा व्यवसाय सुरु केला. त्यातून गडगंज कमाई त्याने केली. त्याला ड्रग्सचा फॉर्म्यूला देणारा व्यक्ती केमिकल इंजिनिअर (Chemical Engineer) आहे. 

ललितला ड्रग्सचा फार्मूला देणारा व्यक्ती कोण?

ललितला ड्रग्सचा फॉर्म्यूला देणारा व्यक्ती हा केमिकल इंजिनिअर असून अरविंद लोहारे (Arvind Lohare) त्याचं नाव आहे. येरवडा कारागृहात असताना मेफेड्रोन ड्रग्स कस तयार करतात हे अरविंदने ललितला सांगितलं होतं. त्यासाठी त्याला ललित पाटीलने 35 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. लोहारे याच्यावर नाशिक आणि इगतपुरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

अरविंद लोहारे याच्या सांगण्यावरुन हरीश पंत (Harish Pant) याने भूषण पाटील (Bhushan Patil) आणि अभिषेक बलकवडे (Abhishek Balkawade) यांची भेट घेतली. त्यानंतर शिवाजी शिंदे, राहुल पंडित आणि इतर साथीदारांच्या मदतीने त्यांनी नाशिक (Nashik) येथे कारखाना सुरु केला. शिंदेनी गावात मेफेड्रोन तयार करण्याचा कारखाना सुरु केला. अरविंद लोहारे हा केमिकल इंजिनियर आहे. तो चाकण येथील ड्रग्स प्रकरणात 2020 पासून येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now