PMP आणि मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर! तिकिटांबाबत घेतला मोठा निर्णय

On: August 19, 2025 12:35 PM
Pune News
---Advertisement---

Pune Metro Ticket | पुणेकरांनो सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल होणार आहे. PMPML आणि पुणे मेट्रो प्रवाशांना आता वेगवेगळ्या अॅप्सची कसरत करावी लागणार नाही. दोन्ही संस्थांनी एकात्मिक तिकीट प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला असून, एका मोबाईल अॅपमधूनच बस आणि मेट्रोचे तिकीट खरेदी करण्याची सोय लवकरच उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासाचे नियोजन सुलभ होईल आणि तिकीट प्रक्रियेत लागणारा वेळ वाचेल. (Pune Metro Ticket)

नुकत्याच झालेल्या बैठकीत PMPML प्रशासन आणि मेट्रो प्रशासन यांनी तिकीट प्रणाली एकमेकांच्या सॉफ्टवेअरशी जोडण्यासाठी आवश्यक API हस्तांतरणावर सहमती दर्शवली आहे. पुढील आठवड्यात दोन्हींच्या तांत्रिक विभागांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, सेवेला कधीपासून सुरूवात करायची यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. PMPML चे अध्यक्ष पंकज देवरे यांनी विषयाला गती दिल्याने अंमलबजावणीची प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे.

एका अॅपमधून दोन्ही तिकिटांची सोय :

सध्या ‘आपली PMPML’ अॅपचा वापर सुमारे 10 लाख प्रवासी करतात, तर मेट्रो अॅपचे एक लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत. प्रस्तावित व्यवस्थेत या दोन्ही अॅप्सची तांत्रिक माहिती, प्रवाशांची खाती आणि तिकीट व्यवहारांची नोंद सॉफ्टवेअरच्या माध्यमातून परस्पर हस्तांतरित केली जाणार आहे. परिणामी, वापरकर्त्याला वेगळे अॅप डाऊनलोड करण्याची किंवा स्वतंत्र लॉगिन तयार करण्याची गरज कमी होईल.

एकात्मिक तिकीट प्रणाली लागू झाल्यानंतर, प्रवाशांना एका इंटरफेसवर बस आणि मेट्रो दोन्हीचे पर्याय दिसतील. आवश्यक प्रवास निवडून डिजिटल पेमेंटद्वारे त्वरित तिकीट मिळेल. एकाच पावतीवर दोन्ही प्रवासाची पुष्टी मिळाल्याने तपशील जपण्याच टेन्शन कमी होईल. ही सोय दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. (Pune Metro Ticket)

Pune Metro Ticket | समन्वय वाढ, अनुभव सुधार :

या उपक्रमामुळे शहरातील बस आणि मेट्रो सेवांमध्ये समन्वय वाढेल. गर्दीच्या वेळेत मार्ग, वेळापत्रक आणि कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन प्रवासी आपला प्रवास अधिक अचूकपणे आखू शकतील. एका अॅपवरच सगळे पर्याय उपलब्ध असल्याने तिकीट रांगा, काऊंटरवरील विलंब आणि अॅप-स्विचिंगचा त्रास कमी होईल. (Pune Metro Ticket)

गेल्या काही महिन्यांपासून या उपक्रमावर चर्चा सुरू असली तरी प्रगती संथ होती. आता प्रशासनातर्फे स्पष्ट कृती आराखडा पुढे येत असून, तांत्रिक एकात्मतेनंतर सेवेला प्रत्यक्ष प्रारंभ दिला जाणार आहे. योजना यशस्वी ठरल्यास पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक एकात्मिक, कार्यक्षम आणि ग्राहक-केंद्रित होईल. डिजिटल पेमेंट्समुळे व्यवहार सुरक्षित आणि पारदर्शक राहतील, तर तक्रारींचे निवारणही जलद होण्याची शक्यता आहे.

News Title: One App for PMPML Bus and Pune Metro Tickets: Unified Ticketing to Save Commuters’ Time

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now