मनसेतील एकेकाळचे पक्के मित्र झाले कट्टर वैरी!

On: December 7, 2022 6:53 PM
---Advertisement---

पुणे | मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वीच मनसे माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक निलेश माझिरे यांची उचलबांगडी केली होती. त्यानंतर निलेश माझिरे यांनीही आक्रमक होत कार्यकर्त्यांसह पक्ष सोडल्याचे जाहीर केले होतं.

सगळ्या राजकीय वादामुळे आता वसंत मोरे आणि निलेश मोरे यांच्यात कटुता निर्माण झाली आहे. निलेश माझिरे यांनी पक्ष सोडल्यानंतर वसंत मोरे यांनी आता माझा त्यांच्याशी संबंध उरलेला नाही, असं वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य ऐकून दुखावलेल्या निलेश माझिरे यांनीही मलादेखील वसंत मोरे यांची गरज नसल्याचं म्हटलंय.

ज्यावेळी त्याता अडचणीत होते त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. मात्र आता त्यांनी असं बोलणं चुकीचं आहे. तात्यांनी मला फोन केला होता की तुझा फोन बंद ठेव महाराष्ट्र सैनिक म्हणून राहा, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच निलेश माझिरे यांनी संघटनेतील अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीच त्यांनी मनसे सोडण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र राज ठाकरे यांनी समजूत काढल्यानंतर निलेश माझिरे यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता.

वसंत मोरे यांनीच निलेश माझिरे यांना शिवतीर्थवर नेले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी माझिरे यांना माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्षपद दिले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच राज ठाकरे यांनीच माझिरे यांना पदावरून दूर केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now