अरे वाह! तुमचे केस तुम्हाला महिन्याला 25,000 रुपये कमवून देऊ शकतात

On: February 16, 2023 5:35 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | स्त्रीचं सौंदर्य म्हणजे तिचे सुंदर लांबसडक केस (Hair) होय. केसांमुळं स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते. अनेक स्त्रींया त्यांच्या केसांची काळजी अगदी प्राणपणाने घेत असतात. काहींना मोठे केस नको वाटतात, काहींना लहान केस आवडतात,मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? की याच केसाने आपल्याला पैसे देखील मिळू शकतात.

हल्ली अनेक वेगवेगळ्या बिझनेस (business) आयडिया येत आहेत. घरीबसल्या तुम्ही पैसे कमवायचा विचार करत असाल तर तुमचे केस तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतात. तुम्ही कधी विचार केलाय का तुम्ही जेव्हा पार्लरला केस कट करण्यासाठी जाता तेव्हा हे पार्लरवाले तुमचे हे केस विकून कसे आणि किती पैसे कमावतात.

कट केलेल्या केसांना आपल्याकडं कचरा मानला जातो. हाच केसांचा कचरा तुम्हाला बक्कळ कमाई करुन देऊ शकतो. या केसांपासून अनेक वस्तू तयार होतात. या केसांचा उपयोग कृषी(agriculture), वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्रात (Construction sites) देखील केला जातो. पार्लर किंवा न्हावी हे तुमचे केस बाजारात किंवा परदेशात विकतात. या कामाला केसांचा व्यवसाय म्हणतात.

या केसांचा उपयोग भारत(India), चीन(Chin) आणि अमेरिकेत(America) खतं बनवण्यासाठी केला जातो. केसांपासून विविध प्रकारच्या दोऱ्या, स्टफिंग खेळणी(Stuffing toys), फर्निचर, गाद्या, काॅस्मेटिक ब्रश या गोष्टी बनवल्या जातात. यांपासून अनेक सुंदर काॅस्मेटिक्स बनवल्या जातात. बनावट मिशा, बनावट केस, भुवया, दाढी हे या केसांपासून बनवले जातात जे आपण कचरा म्हणून टाकून देतो.

या व्यवसायात मिळणारा फायदा प्रंचड आहे. अनेकदा हे तुमच्या केसांच्या प्रमाणावर अवलंबून असतं. कधी कधी खूप जास्त तर कधी खूप कमी कमाई मिळते. तरीदेखील तुमच्याकडं योग्य प्रमाणात केस असले तर तुम्ही महिन्याला आरामात 20,000 ते 25,000 कमवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now