१४ सोन्याच्या चेन, १५ हिऱ्याच्या अंगठ्या,’या’ महिला अधिकाऱ्याच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

On: September 17, 2025 10:29 AM
Nupur Bora Corruption Case
---Advertisement---

Nupur Bora Corruption Case | आसाम सिव्हिल सर्व्हिसेस (ACS) अधिकारी नुपूर बोरा हिच्या घरी पडलेल्या छाप्यात प्रचंड रोख रक्कम, सोनं आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत. अवघ्या ६ वर्षांच्या सेवेत तिने जमवलेली संपत्ती पाहून तपास अधिकारीही थक्क झाले. तिच्या घरातून ९२ लाखांहून अधिक रोख रक्कम आणि कोट्यवधींचे दागिने मिळाले आहेत.

सोनं–हिर्‍यांचा खजिना :

व्हिजिलन्स टीमने बारपेटा आणि गुवाहाटीतील तिच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत १४ सोन्याच्या चेन, १५ हिऱ्याच्या अंगठ्या, २ हिऱ्याचे हार, ३ सोन्याच्या बांगड्या जप्त झाल्या. त्याशिवाय गुवाहाटीतील माळीगाव फ्लॅटमधून ८१.८३ लाख रुपये कॅश आणि बारपेटा येथील घरातून १०.६७ लाख रुपये रोख सापडले. अशा प्रकारे एकूण ९२.५० लाख रुपये आणि जवळपास १ कोटींचे दागिने हाती लागले. (Nupur Bora Corruption Case)

२०१९ मध्ये सेवेत दाखल झालेल्या नुपूर बोराने (Nupur Bora) अल्पावधीतच संपत्तीचा डोंगर उभारला. तपासात तिची मालमत्ता उत्पन्नापेक्षा तब्बल ४१६.२६% जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुवाहाटीत तिच्या नावावर ३ फ्लॅट आणि २ भूखंड, तर UPI पेमेंटद्वारे ९ लाखांचा व्यवहार झाल्याचेही पुरावे मिळाले आहेत. तपास अधिकारी रोझी कलिता यांनी ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती असल्याचे सांगितले.

Nupur Bora Corruption Case | वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त :

नुपूर बोरा हिचे आयुष्यही वादग्रस्त राहिले आहे. तिचे दोनदा लग्न आणि दोनदा घटस्फोट झाले आहेत. पहिल्या विवाहातून तिला एक मुलगी आहे. कार्बी आंगलोंग, बारपेटा आणि गराईमारी येथे कार्यरत असताना तिने जमिनींच्या व्यवहारातून भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमवली असल्याचे आरोप आहेत. तिचे नाव सुरजीत डेका या सहकाऱ्यासोबतही जोडले जात असून, या प्रकरणात त्याचाही सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (Nupur Bora Corruption Case)

३१ मार्च १९८९ रोजी जन्मलेली नुपूर बोरा ही शिक्षक कुटुंबातून आलेली आहे. गुवाहाटीतील कॉटन कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर तिने इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली. नागरी सेवेत येण्यापूर्वी ती शिक्षिका आणि व्याख्याता म्हणून काम करत होती. सप्टेंबर २०१६ मध्ये सरकारी शाळेत पहिली नोकरी मिळाली, तर २०१९ मध्ये ACS सेवेत दाखल झाली. परंतु, अल्पावधीतच तिने भ्रष्टाचाराचे जाळे विणून प्रचंड संपत्ती जमवली.

News Title: “Nupur Bora Corruption Case: Gold, Diamonds and ₹92 Lakh Cash Seized in Assam”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now