आता निर्माते विवेक अग्निहोत्रींचाही सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर मोठा खुलासा

On: December 28, 2022 3:24 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या(Sushant Singh Rajput)आत्महत्येला अडीच वर्षे होऊन गेली तरी हे प्रकरण अजूनही चर्चेत येत आहेत. त्यातच आत्महत्येनंतर सुशांतला ज्या रूग्णालयात नेण्यात आले होते,त्या रूग्णालयातील कर्मचाऱ्याने सुशांतची आत्महत्या नसून हत्या झाली आहे, असा दावा केला आहे.

त्यानंतर सुशांतच्या वकिलानेही सुशांतच्या आत्महत्येमागे मोठे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र सीबीआय शोधून काढू शकतं, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं सिनेसृष्टीला आणि सुशांतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

त्याचपाठोपाठ आता चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांनी ट्विट करत आपले मत व्यक्त केलं आहे. त्यांनी सुशांतसोबतचा एक फोटो शेअर कर लिहिलं आहे की, ते मलाही नाही सोडणार. ते कोण होते, मित्रा?

विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर विविध चर्चांणा उधाण आलं आहे. अनेकजण विवेक यांच्या धाडसाचं कमेंट्सच्या माध्यमातून कौतुक करत आहेत.

दरम्यान, आता विवेक यांच्या ट्विटमुळं सुशांत आत्महत्येप्रकणाला नवीन वळण येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now