मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळीनं(Prajakta Mali) अल्पावधीतच मराठी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर यशाचा शिखरावर पोहचली आहे.
प्राजक्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी तिनं ऐतिहासिक दागिन्यांचा ब्रॅंड सुरू केल्यानं ती चर्चेत आली होती. परंतु आता ती तिच्या लव्ह लाईफमुळं चर्चेत आली आहे.
प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांना नेहमीच प्राजक्ताच्या खासगी आयुष्याबद्दल आणि तिच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घेण्यास आवडते. त्यातच प्राजक्ता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या डेटिंगबाबत बिनधास्त बोलली आहे.
मुलाखतीदरम्यान प्राजक्ताला विचारण्यात आलं की, शेवटचं डेट कधी केलं आहे?, त्यावर प्राजक्ता म्हणाली, मी शेवटचं डेट साडेचार वर्षांपूर्वी केलं आहे. प्राजक्तानं दिलेल्या या उत्तरावरून तरी असं दिसतंय की, सध्या तिच्या आयुष्यात कोणीही नाही किंवा ती कोणाला डेट करत नाही.
दरम्यान, प्राजक्ता माळीनं छोटा पडदा तर गाजवला आहेच पण सध्या ती मोठ्या पडद्यावरही धुमाकूळ घालत आहे. तिनं चंद्रमुखी या चित्रपटात साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
महत्वाच्या बातम्या-






