आता आधी पैसे भरा मगच मिळणार वीज!, लवकरच बसणार नवे मीटर

On: August 11, 2023 3:11 PM
---Advertisement---

मुंबई | वीज सेवासुद्धा प्रीपेड आणि पोस्टपेड होणार आहे. त्यासाठी आता प्रत्येक घरी जुने मीटर हटवून नवे स्मार्ट मिटर (Smart Mteter) लावण्यात येणार आहेत. प्रिपेड/स्मार्ट मिटर बसवल्यास ग्राहकाद्वारे जितक्या पैशाचे रिचार्ज केलं जाईल तेवढी वीज त्यांना वापरण्यास मिळेल आणि त्यानंतर मीटर आपोआप बंद होईल.

स्मार्ट मिटरमुळे कंपनीची सोय होणार आहे. स्मार्ट आणि प्रीपेड योजनेअंतर्गत कोणत्याही ग्राहकाकडून मीटर घेण्यासाठी चार्जेस घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

या मीटरची रक्कम वार्षिक महसुलातून भागावली जाईल म्हणजे मीटरचा भुर्दंड ग्राहकांवर अप्रत्यक्षपणे पडणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा वीज वितरण कंपनीला सर्वाधिक फायदा होईल कारण वीज वापरण्याआधी पैसे आधीच दिल्याने कंपन्यांना थकबाकीचा सामना करावा लागणार नाही.

दरम्यान, अदानी पॉवरसह चार कंपन्यांना एलओए अर्थात स्वीकारपत्र जारी करण्यात आले आहे. आता या कंपन्यांना एकूण 27 महिन्यांत राज्यभरातील 2.37 कोटी ग्राहकांचे मीटर बदलवून प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागतील.

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now