आता 500 रूपयात मिळणार गॅस सिलेंडर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

On: December 20, 2022 12:01 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | अल्वर जिल्ह्यातील मालाखेडा येथे सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

अशोक गेहलोत यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरबाबत मोठी घोषणा केली. आम्ही एक श्रेणी बनवत आहोत. या श्रेणीतील लोकांना 1,050 रुपयांचे घरगुती स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर 500 रुपयांना दिले जाणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

राज्यात एप्रिलपासून सिलेंडर उपलब्ध होणार आहे. पुढील महिन्यात आम्ही अर्थसंकल्प सादर करू, ज्यामध्ये महागाईचा भार कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील किट वाटपाची योजना आणू, असंही ते म्हणालेत.

पूर्वी लोक इन्कम टॅक्स, ईडीला घाबरत होते, आता ते स्वतःच घाबरले आहेत. देशात लोकशाहीची मुळे कमकुवत झाली आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

राहुल गांधी एका उद्देशाने चालले आहेत. स्वातंत्र्यानंतरची ही पहिली भारत जोडो यात्रा आहे. संपूर्ण देश महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ERCP थांबवणार नाही. त्याची राष्ट्रीय योजना म्हणून नोंदणी होण्यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. राजस्थानचा आगामी अर्थसंकल्प तरुणांना समर्पित असेल, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now