नोरा नव्हे तर आर्यन खान करतोय ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट?

On: January 7, 2023 6:47 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan) सध्या त्याच्या ‘पठाण'(Pathaan) या चित्रपटामुळं चर्चेत आहे. त्यातच शाहरूखचा लेक आर्यन खानही(Aryan Khan) त्याच्या अफेअरमुळं चर्चेत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आर्यन खानचं नाव डान्सर नोरा फतेहीसोबत जोडलं जात आहे. नोरा आर्यनच्या दुबईतील पार्टीतही समील झाल्याच्या चर्चा होत्या. परंतु यावर दोघांनीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

या सगळ्यात आता आर्यनचं नाव एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय. अभिनेत्री सादिया खानसोबत(Sadia Khan) आर्यनचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहता नेटकरी आर्यन सादियाच्या प्रेमात आहे, असा अंदाज लावत आहेत.

या व्हायरल फोटोसाठी त्यांनी एकमेकांच्या खूप जवळ उभा राहून पोज दिली आहे, असं दिसत आहे. हेच पाहून नेटकरी त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा करत आहेत.

हा व्हायरल फोटो कोणत्या ठिकाणचा आहे किंवा ते दोघं कोणत्या निमित्तानं भेटले होते, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र आर्यन नक्की नोराच्या प्रेमात आहे की सादियाच्या प्रेमात आहे, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now