घाबरू नका! जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; सरकारचे आवाहन

On: May 10, 2025 4:27 PM
India-Pakistan Tension
---Advertisement---

India-Pakistan Tension | भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सोशल मीडियावर इंधन आणि अन्नधान्य साठा संपत असल्याचे मेसेजेस व्हायरल होत आहेत. काही राज्यांमध्ये नागरिकांनी पेट्रोल-डिझेल (Petrol- diesel साठवून ठेवण्याची घाई केल्याचेही दिसून आले. मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारने (Central Govt) दिला आहे.

सोशल मीडियावर दिली माहिती :

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, “आपल्याकडे तांदूळ, गहू, डाळी, साखर आणि खाद्यतेल यांचा आवश्यकतेपेक्षा अधिक साठा आहे. कोणतीही कमतरता नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.”

इंडियन ऑईलनेही अधिकृत निवेदनात स्पष्ट केलं आहे की, देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि वितरण व्यवस्था सुरळीत आहे. कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्यामुळे नागरिकांनी रांगा लावू नयेत. (India-Pakistan Tension)

India-Pakistan Tension | अन्नधान्य आणि इंधन साठा – सरकारचे आकडे काय सांगतात? :

तांदूळ साठा – 356.42 लाख मेट्रिक टन
गहू साठा – 383.32 लाख मेट्रिक टन
खाद्यतेल साठा – 17 लाख मेट्रिक टन
साखर उत्पादन – 257 लाख मेट्रिक टन, शिलकी साठा – 50 लाख मेट्रिक टन

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, देशात कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही. शिवाय, मोहरी उत्पादन आणि साखर हंगाम अनुकूल असल्यामुळे आगामी काळातही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. (India-Pakistan Tension)

साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई :

सरकारने व्यापारी, घाऊक व किरकोळ विक्रेते आणि व्यावसायिकांना ‘आवश्यक वस्तू कायदा’ अंतर्गत कारवाईचा इशारा दिला आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.

News Title: No Shortage of Essentials or Fuel in India Amid India-Pakistan Tensions, Says Government

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now