देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अखेर सस्पेन्स संपला; देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

On: March 28, 2026 4:51 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे भारतात इंधन टंचाईची चर्चा सुरू झाली आहे. पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांची गर्दी आणि गॅस सिलिंडर उशिरा मिळत असल्याने पुन्हा देशात लॉकडाऊन लागू होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र या अफवांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत नागरिकांमधील संभ्रम दूर केला आहे.

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले? :

पश्चिम आशियातील युद्धस्थितीमुळे भारतात इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबलचक रांगा दिसत असून एलपीजी सिलिंडर मिळण्यासही विलंब होत असल्याची तक्रार काही ठिकाणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात परिस्थिती गंभीर होऊन पुन्हा लॉकडाऊन लागू होईल, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत होता.

या चर्चेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की देशात किंवा राज्यात कुठेही लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. काही लोक मुद्दाम खोटी माहिती पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पसरवणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Devendra Fadnavis | गॅस टंचाई टाळण्यासाठी सरकारची योजना :

इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सरकार विविध पावले उचलत असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. एलपीजी सिलिंडरवरचा ताण कमी करण्यासाठी पाईपद्वारे गॅस पुरवठा म्हणजेच पीएनजी (PNG) कनेक्शनचा विस्तार करण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना थेट घरापर्यंत पाईपलाइनद्वारे गॅस मिळावा यासाठी प्रशासनाने प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. (fuel crisis India)

या उपक्रमासाठी महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाईप गॅस सुविधा उपलब्ध होऊ शकते. या प्रणालीमुळे एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व कमी होईल आणि भविष्यात गॅस टंचाईचा प्रश्नही कमी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की देशात कुठेही लॉकडाऊन लागू होणार नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोणतीही अप्रमाणित माहिती किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

News Title: No Lockdown in India Clarified

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now