नितीन गिलबिले हत्या प्रकरणात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई!

On: November 15, 2025 10:00 AM
Nitin Gilbile Murder Case
---Advertisement---

Nitin Gilbile Murder Case | पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसा ढवळ्या घडलेल्या नितीन गिलबिले यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. फॉर्च्युनर गाडीत बसलेल्या नितीन यांच्यावर जवळून गोळ्या झाडून झालेल्या खुनानंतर आरोपींनी मृतदेहासह कार रस्त्यावर सोडून पलायन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणातील तपासाला अखेर गती मिळाली असून पोलिसांनी मुख्य आरोपीला गजाआड करण्यात मोठे यश मिळवले आहे. (Nitin Gilbile Murder Case)

अलिकडच्या दोन दिवसांपासून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु होता. गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची पळवाट पाहता पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विविध पथकांनी मोठी शोध मोहीम राबवून शेवटी या सनसनाटी प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या खुनामागील मूळ कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आरोपींच्या शोधासाठी मोठी मोहीम सुरू :

घटना 12 नोव्हेंबर रोजी वडमुखवडी परिसरातील अलंकापुरम रोडलगत घडली होती. नितीन गिलबिले हे त्यांच्या फॉर्च्युनर गाडीत बसलेले असताना साथीदारच असलेल्या अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर या दोघांनी त्यांच्यावर पिस्तूलातून जवळून गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर दोघांनीही तात्काळ घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर गाडी मधोमध रस्त्यावर सोडून मृतदेह पाडल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. (Nitin Gilbile Murder Case)

प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करून शोध मोहीम गतीने राबवली. सुरुवातीला विक्रांत ठाकूरला अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्य आरोपी अमित पठारे हा फरार होता. त्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांचा वापर करून तपास अधिक वेगात केला.

Nitin Gilbile Murder Case | एम्बीव्हॅलीतून मुख्य आरोपीला पिळून काढले :

अखेर मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मुख्य आरोपी अमित पठारेला लोणावळ्यातील एम्बीव्हॅलीतून अटक केली आहे. त्याचा शोध घेताना पोलिसांना तब्बल 48 तासांचे मोठे आव्हान पार करावे लागले. अटकेनंतर त्याच्याकडून प्राथमिक चौकशी सुरू असून खुनामागील कारणांबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येत आहेत.

याआधी विक्रांत ठाकूरही पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. दोन्ही आरोपींची अटक झाल्यानंतर आता या खुनामागील नेमकी कडी क्रमाने जोडली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खुनापूर्वी तिघांमध्ये काही तणाव होता. त्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

संपत्तीच्या वादातूनच ही हत्या :

दरम्यान, प्राथमिक तपासात प्लॉटिंग आणि संपत्तीच्या वादातूनच ही हत्या झाल्याचे संकेत मिळाले आहेत. नितीन गिलबिले आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासूनच आर्थिक वाद सुरू असल्याची माहिती चौकशीतून समोर येत आहे. मृतदेह कारमधून रस्त्यावर ओढून टाकणे, पायावरून गाडी नेणे यासारख्या क्रूर पद्धतीमुळे या प्रकरणाने भयंकर रूप घेतले.

सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशीत या संपूर्ण हत्याकांडामागील अचूक कारण, वापरलेले शस्त्र, आर्थिक वादातील संबंध, तसेच या प्रकरणातील इतर कोणतेही व्यक्ती सामील होत्या का, याबाबत माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे. या अटकेनंतर पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

News Title: Nitin Gilbile Murder Case: Police Arrest Main Accused Amit Pathare from Aamby Valley

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now