सर्वात मोठी बातमी! नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ

On: April 24, 2024 4:43 PM
---Advertisement---

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना यवतमाळच्या पुसद येथील सभेत भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. तेवढ्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना सावरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेदरम्यान ही घटना घडली आहे.

गडकरींना भाषणादरम्यान भोवळ

यवतमाळमध्ये महायुतीच्या जाहीर सभेत भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. यावेळी उपस्थितांनी त्यांना सावरलं. आज राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी ग्राऊंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषणाला उभे राहिलेल्या गडकरींना भोवळ आली.

यवतमाळमध्ये प्रचंड तापामानाचा पारा चढल्याने त्यांना उष्णतेचा त्रास सुरू झाला. ऊन सहन न झाल्याने काही मिनिटांतच त्यांना भोवळ आली.

आजच्या दिवसातील नितीन गडकरी यांची दुसरी सभा होती. सकाळच्या सत्रात बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये त्यांची सभा पार पडली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘बायको,मुलीवरुन बोलाल तर शोधून काढून ..’; महेश मांजरेकरांचा ट्रोलर्सला सज्जड दम

“पुन्हा तुझं थोबाड दाखवू नकोस”, चेन्नईच्या गोलंदाजावर चाहते भडकले

सुरतमध्ये काँग्रेसमुळेच भाजपचा पहिला विजय?, सगळी स्क्रिप्ट आधीच ठरलेली?

…म्हणून IPLमध्ये सचिन तेंडुलकरचा लिलाव कधीच झाला नाही!

रील्स स्टार महिन्याला किती पैसे कमावतात? कमाई ऐकून व्हाल थक्क

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now