उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली

On: February 1, 2023 11:42 AM
---Advertisement---

मुंबई | ठाकरे गटाचे आमदार अनिल परब(Anil Parab) यांच्या बांद्र्यातील कार्यालयावर म्हाडाकडून कारवाई करण्यात आली आहे. यानंतर शिंदे गट-भाजप(BJP) विरोधात ठाकरे गट हा वाद पाहायला मिळत आहे.

नुकतंच या मुद्द्याला धरून भाजप आमदार नितेश राणेंनी(Nitesh Rane) उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) टोला लगावला आहे. राणेंनी ठाकरेंचा ‘नामर्द’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळं राणेंनी खालच्या पातळीला जाऊन टीका केली आहे, अशा सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहे.

अनिल परबांचे घर ही तर झाकी असून मोतश्री टू बाकी आहे, असा इशाराही राणेंनी अनिल परब यांच्यासह ठाकरेंना दिला आहे. परब यांनी सुक्या धमक्या देऊ नये, कारण आमच्याच घरात येऊन धिंगाणा घालणं इतकं सोपं नाही. ही काय मोतोश्री नाही, असा टोमणाही त्यांनी परब यांना लगावला.

राणेंच्या घरावर तक्रार करण्यापूर्वी, जो त्याचा उद्धव ठाकरे नावाचा बाप आहे त्याच्या घराच्या पुढं बघ काय होतंय, असा गंभीर इशाराही राणेंनी परब यांना दिला आहे.

पुढं राणे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीबद्दल बोलताना म्हणाले की, राज्यात आमचं सरकार आहे त्यामुळं सगळं काही सुरळीत सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now