Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याबाबत आरक्षणाची मागणी करताना दिसत आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांचा सलाईनमध्ये विष पाजून मला मारण्याचा प्लान आहे, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले होते. यावरून आता राजकीय गदारोळ पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत होते. त्यांचा उपोषणाचा 16 वा दिवस आहे. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी ठरवलं तर होऊ शकतं, असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मला मारण्याचा प्लान केला आहे. माझ्या सलाईनमध्ये विष टाकण्याचा प्लान केला आहे. म्हणून मी आता सलाईन काढून टाकलं आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना झाले होते.
देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येत आहे. त्यांनी माझा एन्काऊंटर करून बळी घ्यावा असं ते म्हणाले. मी त्यांच्या पायाशी जात उपोषण करणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. यावर आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
निलेश राणेंचा पलटवार-
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. आता त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व सर्वांना माहिती आहे. मराठा समाजाला आधी त्यांनीच आरक्षण दिलं आहे. जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर बोलू नये. हे चुकीचं आहे कारण आम्हीही मराठा आहोत, वेळ आल्यावर दाखवून देऊ असं नितेश राणे म्हणाले आहेत.
“स्क्रिप्टला तुतारीचा वास”
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वार बोलू नये. त्यांना फडणवीस यांना टार्गेट करायचं आहे की आंदोलन करायचं आहे. जरांगे जी स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत. त्याला तुतारीचा वास आहे. त्यांनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये. सागर बंगल्याच्या बाहेर ज्या भिंती आहेत तिथूनच जावं लागेल, असं नितेश राणे म्हणाल्या आहेत.
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे. मराठा समाज खुश आहे, मात्र मनोज जरांगे यांना समाधान नाही, असं नितेश राणे म्हणाले आहे.
News title – Manoj Jarange Patil On Sagar Bunglow Nitesh Rane Statement
महत्त्वाच्या बातम्या-
“सागर बंगल्याबाहेरील मोठी भिंत पार करा…”; नितेश राणेंचं जरांगेंना आव्हान
सदावर्तेंनी शरद पवारांचं नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी
‘खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी…’; जरांगे भडकले
आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना चॅलेंज, म्हणाले…
मनोज जरांगे पाटील सागर बंगल्याकडे रवाना!






