“पक्षासाठी संयम बाळगला, पण आता…”; नितेश राणेंच्या ‘त्या’ विधानाने राजकारणात खळबळ!

On: December 22, 2025 2:37 PM
Nitesh Rane
---Advertisement---

Nitesh Rane | राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेषतः कोकणातील निकालानंतर भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या निकालानंतर नितेश राणेंनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावना सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

“पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो… पण काही गोष्टी बोलल्या नाहीत, तर त्या खऱ्या वाटायला लागतात. आता ती वेळ आली आहे,” असे ट्विट नितेश राणेंनी केल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या विधानामागे नेमकं कोण किंवा काय आहे, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.

कोकणातील निकालांमुळे चर्चांना उधाण :

नगरपरिषद निवडणुकांमध्ये कोकणातील निकालांकडे विशेष लक्ष लागलं होतं. मालवण नगरपरिषदेवर शिंदे गटाच्या शिवसेनेने वर्चस्व मिळवत 10 जागांवर विजय मिळवला, तर भाजपाला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचे 11 उमेदवार विजयी झाले, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 7 जागा, काँग्रेसला 1 आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला 1 जागा मिळाली.

कणकवली नगरपरिषदेत भाजपाने 9 जागांवर विजय मिळवला असला तरी नगराध्यक्षपदावर शहर विकास आघाडीचे संदेश पारकर 145 मतांनी विजयी झाले. या निकालामुळे कणकवलीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री असलेल्या नितेश राणेंना राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंच्या सूचक पोस्टकडे पाहिले जात आहे.

Nitesh Rane |राज्यात भाजपाचा वरचष्मा, तरीही अंतर्गत हालचाली :

एकूण निकाल पाहता नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपाचाच वरचष्मा दिसून आला आहे. 288 पैकी 117 नगराध्यक्षपदांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले असून, 34 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नंदुरबार आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता भाजपाने राज्यभर मजबूत कामगिरी केली आहे.

भाजपानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे 53 नगराध्यक्ष निवडून आले असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 37 उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून, तिन्ही पक्षांना मिळून केवळ 44 जागांवर विजय मिळवता आला आहे.

या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचं “आता बोलण्याची वेळ आली आहे” हे विधान केवळ भावनिक नसून, भविष्यातील राजकीय घडामोडींचा संकेत असल्याचं मानलं जात आहे. कोकणातील निकाल, कणकवलीतील सत्तासंघर्ष आणि पक्षांतर्गत समीकरणं यामुळे येत्या काळात नितेश राणेंची भूमिका अधिक आक्रमक होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

News Title: nitesh Rane Statement After Nagarparishad Result 2025 Sparks Political Buzz in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now