Budget 2024 | सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी; निर्मला सीतारमण यांची सर्वात मोठी घोषणा

On: February 1, 2024 1:28 PM
Budget 2024
---Advertisement---

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा कायम ठेवली आहे. अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकाभिमुख घोषणा केल्या जात नाहीत. यामुळेच सरकारनं कोणत्याही घोषणा करण्याचं टाळलं आहे, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय. निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी दिलीये.

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर पद्धतीत काहीच बदल केला नाही. मागील वर्षांप्रमाणे आयकर राहणार आहे. म्हणजेच सात लाखांपर्यंत उत्पन्नावर कोणताही कर राहणार नाही, असं निर्मला सीतारमण म्हणाल्यात.

Budget 2024 | टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

मागील वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Budget 2024) 7 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त केले होते. त्यानंतर 8 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना 35 हजार रुपये कर भरावा लागणार आहे. तर 9 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 45 हजार, 10 लाख उत्पन्नावर 60 हजार, 12 लाख उत्पन्नावर 90 हजार आणि 15 लाख उत्पन्नावर 1 लाख 50 हजार रुपये टॅक्स भरावा लागणार आहे. यावर्षी हा स्लॅब कायम आहे. त्यात कोणताही बदल केला नाही.

आयकर भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. परतावा देखील त्वरीत जारी केला जातो. जीएसटी संकलन दुपटीने वाढले आहे. जीएसटीने अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलली आहे, असं त्यांनी सांगितलं.

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. मी कर दरात कपात केली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल.

मागील वर्षी दोन प्रणाली लागू केल्या होत्या. त्यात नवीन प्रणाली घेणाऱ्या करदात्यांना सात लाखांपर्यंत कर नाही. परंतु जुनी प्रणाली काय आहे. त्या प्रणालीत विविध सुट दिली जाते. त्यासाठी गुंतवणूक आणि करसवलतीचे पुरावे द्यावे लागतात. म्हणजेच तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Agriculture Budget 2024 | शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !

Interim Budget 2024 | “2047 पर्यंत भारत…”, निर्मला सीतारमण यांचं मोठं वक्तव्य

Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी

LPG Gas Price | अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

Interim Budget 2024 | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now