Interim Budget 2024 | “2047 पर्यंत भारत…”, निर्मला सीतारमण यांचं मोठं वक्तव्य

On: February 1, 2024 11:51 AM
New GST Rates
---Advertisement---

Interim Budget 2024 | काही महिन्यातच देशात सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वी आज (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) हा अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करत आहेत. शेतकरी, महिला, केंद्रीय कर्मचारी, विद्यार्थी तसेच इतर अनेक घटकांची या अर्थसंकल्पाकडे नजर लागली आहे. सरकार काय नवीन घोषणा करेल, की सर्वसामन्यांची निराशा होईल, याबाबत आता चर्चा होत आहे.

2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचं धोरण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुरुवातीलाच मोठी घोषणा करत अर्थसंकल्पाला (Interim Budget 2024) सुरुवात केली. 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल, असं त्या म्हणाल्या आहेत. विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली असून केंद्रातील मोदी सरकार गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकारचा गेल्या 10 वर्षांपासून ‘सबका साथ सबका विकास’ हाच मंत्र आहे. शेतकरी हे आपले अन्नदाता आहेत. पीएम केअर रिफॉर्म योजनेतीन दरवर्षी 8 कोटी शेतकऱ्यांना फायदा होतो आहे. तसेच, 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचाही फायदा होतो आहे.

आमच्या सरकारने सर्वांगीण, सर्वस्पर्शी व सर्वसमावेशी विकासाचं धोरण ठेवलं आहे.2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचं धोरण आमच्या सरकारनं ठेवलं आहे. या विकासात सर्व जातींचा समावेश आहे. त्या म्हणजे गरीब, महिला, तरुण व अन्नदाता. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास ही आमच्यासाठी प्राधान्याची बाब आहे. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे. त्यांच्या विकासातून देशाचा विकास साध्य होणार आहे, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत.

स्किल इंडिया मिशनअंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण

ट्रिपल तलाक अवैध ठरवणं, संसद व स्थानिक सभागृहांमध्ये एकतृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवणं या निर्णयांमधून महिला सबलीकरणावर सरकारनं भर असल्याचं दाखवून (Interim Budget 2024) दिलं आहे. यासोबतच स्किल इंडिया मिशनअंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, 54 लाख तरुणांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यात आला. 3 हजार नवीन आयटीआयची स्थापना करण्यात आली. 7 आयआयटी, 16 आयआयआयटी,7 आयआयएम, 15 एम्स आणि 390 विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलंय.

मोदी सरकारचे सकल विकासाकडे अधिक लक्ष आहे. सरकार महिला सशक्तीकरणावर भर देणार आहे. गेल्या 10 वर्षांत महिला उच्च शिक्षण घेत आहेत. पीएम आवास योजने अंतर्गत 70 टक्के घर ग्रामीण महिलांना मिळाले आहेत. तसेच युवांना सशक्त करण्यासाठीही सरकारचे प्रयत्नशील असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत., असंही सीतारमण म्हणाल्या आहेत.

News Title- Nirmala Sitharaman Big statement in Interim Budget 2024 

महत्त्वाच्या बातम्या – 

LPG Gas Price | अर्थसंकल्पाआधीच सर्वसामान्यांना दणका, गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

Interim Budget 2024 | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Jay Shah सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष; ACC चा मोठा निर्णय

Maratha resevation | ‘…तो अंतिम निर्णय नाही’; मराठा आरक्षणाबाबत भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

Pune News | पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदली, आता क्रिकेटपटूला दणका देणाऱ्या डॅशिंग अधिकाऱ्याकडे पुण्याचा कारभार

Join WhatsApp Group

Join Now