‘अजित पवार तुमची लायकी नाही’; निलेश राणे संतापले

On: January 5, 2023 5:41 PM
---Advertisement---

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजीमहाराज हे धर्मवीर नव्हते, असं वक्तव्य केलं होतं. यावरून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही विरोधकांनी केली. यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.

अजित पवारांनी पुन्हा एकदा संभाजीमहाराज हे धर्मवीर नव्हते असं म्हटलं. तसेच मी माफी मागणार नाही मी काहीही चुकीचं वक्तव्य केलं नाही, असं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

अजित पवारांच्या पत्रकार परषदेनंतर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी पवार कुटुंबावर देखील आरोप केलेत.

अजित पवार घाबरलेल्या अवस्थेमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पण त्यांनी घाबरलंच पाहिजे कारण ते छत्रपती घराण्याबद्दल काहीही बोलतात, असं निलेश राणे म्हणालेत.

अजित पवार एकतर तुमची छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलण्याची लायकी नाही. इतिहास माहिती नसेल तर बोलू नका, असंही निलेश राणे म्हणालेत.

पवार कुटुंब हे नेहमी छत्रपती घराण्याच्याविरोधात राहिलेत. उदयनराजेंना पाडण्यात देखील पवार कुटुंबाचा हात होता, असा आरोपही निलेश राणेंनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now