निलेश राणेंना पुणे महानगरपालिकेचा दणका; पुण्यातील मॉल केलं सील

On: February 29, 2024 12:14 AM
Nilesh Rane
---Advertisement---

Nilesh Rane | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) हे अनेकदा चर्चेत दिसत असतात. मागे काही दिवसांआधी (Nilesh Rane) निलेश राणे आणि भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली पाहायला मिळत होती. त्यावेळी निलेश राणे (Nilesh Rane) चर्चेत होते. आता ते पुण्यातील आर डेक्कन मॉल प्रकरणी अडचणीत आले आहेत.

पुणे महापालिकेनं राणे पिता-पुत्राला नोटीस बजावली आहे. आर डेक्कन मॉल प्रकरणी ते आता अडचणीत आले आहेत. आर के मॉलमधील मिळकत कर न दिल्यानं त्यांना नोटीस बजावली आहे. कर संकलन विभागाने थकित मिळकतीचा भाग सील केला आहे. त्यांची थकबाकी ही साडे तीन कोटी असून कर भरला जात नव्हता अशी माहिती समोर आली आहे. (Nilesh Rane)

दोन मिळकतीचे मजले सील

महापालिकेने मिळकतीचे वरील तीन मजल्यापैकी दोन मिळकतीचे मजले सील करून ठेवले आहेत. महापालिकेवर वारंवार दबाव टाकण्याचं काम सुरू होतं. तसेच एक सील बंद केल्यानंतर गाजावाजा व्हायचा त्यानंतर आता महापालिकेनं याबाबत नोंद घेतली असून ही माहिती प्रशासनाकडून गोपनीय ठेवण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव

सध्या पुणे शहरामध्ये मिळकतीवरून सील करण्याची कारवाई सुरू आहे. मंत्री महोदयांच्या मिळकतीची थकबाकी असल्याने पालिकेकडून त्यांना दोन वर्षांपासून नोटीशी बजावण्यात आल्या होत्या. यावेळी नोटीशीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात होता. त्यामुळे कारवाई होत नसल्याचा दावा आहे.

या प्रकरणावरून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी दिली जात होती. यामुळे पालिकेनं कोणतंही पाऊल पुढं टाकलं नाही. मात्र आता पालिकेनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत मिळकतीला टाळे लावले आहेत.

याबाबत आता निलेश राणे आणि नारायण राणे काय भाष्य करतील याबाबतची माहिती लवकरच समोर येईल.

News Title – Nilesh Rane Property At deccan Mall sealed

महत्त्वाच्या बातम्या

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज!

शिवलिंगवर चुकूनही ‘ही’ फुले वाहू नका; अन्यथा…

मनोज जरांगे पाटील संतापले, मराठ्यांना केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

गौतमी पाटील ‘या’ पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

अत्यंत धक्कादायक! शालेय पोषण आहारात चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष

 

Join WhatsApp Group

Join Now