पुण्यात खळबळ! निलेश घायवळच्या घरी पोलिसांची छापेमारी, ‘या’ वस्तू केल्या जप्त

On: September 27, 2025 11:56 AM
Nilesh Ghaywal
---Advertisement---

Nilesh Ghaywal Raid | पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्यावर पोलिसांचा मोठा शिरकाव सुरूच आहे. कोथरुडमधील गोळीबार प्रकरणानंतर घायवळ व त्याच्या टोळीवर मकोका (MCOCA action) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी थेट कोथरुड येथील त्याच्या घरावर छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी घरातून २ स्कॉर्पिओ गाड्या आणि २ दुचाकी जप्त केल्या आहेत. मात्र, छाप्याआधीच घायवळ परदेशात गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्याच्यावर लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून, तो भारतात परतल्यास तात्काळ अटक होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Nilesh Ghaywal Raid)

लंडनमध्ये आसरा घेतल्याचा संशय :

पोलिस तपासात घायवळ लंडनला पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने पासपोर्ट स्वतःकडेच ठेवल्यामुळे तो सहज देशाबाहेर गेला, असे उघड झाले. इतकेच नव्हे तर लंडनमध्ये त्याने घर घेतले असून त्याचा मुलगाही तिथे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरात १० दिवसांपूर्वी झालेल्या कोथरुड (Kothrud) गोळीबार प्रकरणात घायवळ हा मुख्य आरोपी आहे. या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घायवळसह १० जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. (gangster Nilesh Ghaywal in London)

Nilesh Ghaywal Raid | गुन्हेगारीचा मोठा इतिहास :

निलेश घायवळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर तब्बल २४ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. तो मुळचा जामखेड तालुक्यातील असून पूर्वी गजा मारणे टोळीत सक्रिय होता. त्याची सुतारवाडी परिसरात दहशत होती. मारणे टोळीतून बाहेर पडून त्याने स्वतःची टोळी स्थापन केली. (Nilesh Ghaywal Raid)

सचिन कुडले हत्याकांडात तो तुरुंगात गेला होता आणि २०२३ मध्येच सुटला होता. त्याच्यावर मारामारी, हत्येचा प्रयत्न, हत्या, अपहरण असे गंभीर गुन्हे आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही त्याला पासपोर्ट कसा मिळाला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

News title : Nilesh Ghaywal Raid: Pune Police Seize 2 Scorpios and Bikes, Gangster Absconding in London

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now