ललित पाटील प्रकरणात नवा ट्विस्ट!

On: October 28, 2023 8:12 PM
---Advertisement---

नाशिक | ड्रग्स माफिया ललित पाटीलबाबत (Lalit Patil) दिवसेंदिवस नवनविन माहिती समोर येत आहे. ललितला ड्रग्सच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत ललितच्या संपर्कात असलेल्या 17 जणांना अटक करण्यात आलीये. त्यांच्याकडून नवनविन गोष्टींचा खुलासा समोर येत आहे. दरम्यान ललित प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे.

नाशिकच्या(Nashik) नदीत ललित पाटीलच्या एका मित्रांने तब्बल 100 कोटी रुपयांच्या असपास असलेले ड्ग्स फेकले होते. त्यानंतर नाशिकचे पोलिस सर्तक झाले आणि याबाबत आणखी खोलावर जाऊन शोध सुरु केला. सध्या जिल्ह्यातील बंद पडलेल्या कारखान्यांची (Factory) तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर औद्योगिक वसाहत, पोलीस, कामगार विभाग यांच्यांकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणावरून आता जिल्हा प्रशासनाच्या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ललित बाबत रोज नवनविन खुलासे होत असल्याने प्रशासन सध्या या गोष्टीकडे गांभीऱ्याने लक्ष देत आहे.

थोडक्यात बातम्या-  

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now