आता फक्त 99 रुपयांत पेन्शन मिळणार; जाणून घ्या केंद्र सरकारची भन्नाट स्किम

On: August 13, 2026 2:13 PM
NPS for Gig Workers
---Advertisement---

NPS for Gig Workers | झोमॅटो, स्विगी, ब्लिंकइट आणि अर्बन कंपनीसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्ससाठी केंद्राकडून महत्त्वाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीअंतर्गत (NPS) आता हे कामगार अल्प रकमेपासून स्वतःचा निवृत्ती निधी सुरू करू शकतात. केवळ 99 रुपयांच्या योगदानाने खाते सुरू करण्याची मुभा देण्यात आली असून, योगदानाची रक्कम आपल्या क्षमतेनुसार वाढवण्याचीही मुभा आहे.

99 रुपयांपासून सुरू करता येणार NPS खाते :

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) बुधवारी गिग वर्कर्ससाठी एनपीएसची नवी चौकट जाहीर केली. या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या लाखो कामगारांना निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाचा पर्याय मिळणार आहे. नियामकाने स्पष्ट केलं आहे की, गिग वर्कर्सचं उत्पन्न बुकिंग किंवा उपलब्ध कामावर अवलंबून असलं तरी त्यांच्या निवृत्तीच्या आर्थिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

या मॉडेलमध्ये गुंतवणुकीची ठरावीक किमान किंवा कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. कामगार 99 रुपयांपासून सुरुवात करू शकतो आणि त्यानंतर आपल्या इच्छेनुसार कितीही रक्कम योगदान म्हणून जमा करू शकतो. विशेष म्हणजे योगदानाची जबाबदारी केवळ कामगारावरच असण्याची गरज नाही. प्लॅटफॉर्म आणि कामगार मिळून योगदान देऊ शकतात किंवा काही परिस्थितींमध्ये प्लॅटफॉर्म एग्रीगेटर कामगाराच्या वतीने संपूर्ण रक्कमही भरू शकतो. PFRDAने 29 ऑक्टोबर 2025 रोजीच्या परिपत्रकातून NPS ई-श्रमिक मॉडेल सुरू केलं असून डिजिटल माध्यमातून सेवा देणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत आणणे हा त्याचा प्रमुख हेतू आहे.

NPS for Gig Workers | ऑनबोर्डिंग प्रक्रिया सोपी, PRANही मिळणार

या व्यवस्थेची रचना कॉर्पोरेट NPS मॉडेलशी साधर्म्य राखणारी असली तरी गिग इकॉनॉमीतील कामगारांचे अनिश्चित उत्पन्न आणि बदलते कामाचे स्वरूप लक्षात घेऊन ती अधिक लवचिक ठेवण्यात आली आहे. यासाठी प्लॅटफॉर्म कंपन्यांना स्वतंत्रपणे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाकडे नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याऐवजी NPS खाती उघडणाऱ्या ‘पॉइंट्स ऑफ प्रेझेन्स’ संस्थांना थेट एग्रीगेटर्ससोबत करार करता येणार आहे. त्यामुळे झोमॅटो किंवा स्विगी सारख्या कंपन्यांना त्यांच्या डिलिव्हरी पार्टनर आणि सेवा पुरवणाऱ्या कामगारांना या योजनेत सहभागी करून घेणे अधिक सोपे होईल.

कामगाराचा NPSमध्ये समावेश करण्यासाठी प्रक्रिया दोन प्रमुख टप्प्यांत पूर्ण केली जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात आधार आधारित ई-केवायसीद्वारे संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता, पॅन कार्ड, मोबाइल क्रमांक आणि बँक खात्याची माहिती तपासली जाते. त्यानंतर कामगाराची संमती घेतल्यानंतर त्याच्यासाठी कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खाते क्रमांक म्हणजेच PRAN तयार केला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक योजना आणि पेन्शन फंड निवडण्याची प्रक्रिया प्लॅटफॉर्मकडून केली जाऊ शकते. मात्र, त्यानंतर कामगाराला आपल्या पसंतीनुसार हे पर्याय बदलण्याचा अधिकार राहतो.

News title : New NPS Framework for Gig Workers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now