Google Pixel 11 Series | Google Pixel 11 सीरिज अखेर भारतीय बाजारात दाखल झाली आहे. कंपनीने एकाच वेळी Pixel 11, Pixel 11 Pro, Pixel 11 Pro XL आणि Pixel 11 Pro Fold हे चार स्मार्टफोन सादर केले आहेत. यासोबत Pixel Watch 5 ही स्मार्टवॉचही लॉन्च करण्यात आली आहे. सर्व डिव्हाइसची प्री-ऑर्डर सुरू झाली असून 20 ऑगस्टपासून विक्रीला सुरुवात होणार आहे.
Pixel 11 पासून Pro Fold पर्यंत किंमत किती? :
Google Pixel 11 ची सुरुवातीची किंमत 89,999 रुपये आहे. या रकमेत 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट मिळतो, तर 12GB RAM आणि 512GB स्टोरेज मॉडेलसाठी 1,04,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन फ्रॉस्ट, हिबिस्कस, पिस्ता आणि ऑब्सिडियन अशा चार रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Google Pixel 11 Pro ची 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 1,19,999 रुपये असून 16GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरियंट 1,34,999 रुपयांना मिळेल. हा फोन कॅनियन, ऑलिव्ह, फॉग आणि ऑब्सिडियन रंगांत येतो. Pixel 11 Pro XL ची किंमत अनुक्रमे 1,34,999 रुपये आणि 1,49,999 रुपये असून त्यातही 12GB+256GB आणि 16GB+512GB असे पर्याय आहेत. Pro XL साठी कॅनियन, ऑलिव्ह, फॉग आणि ऑब्सिडियन हेच चार रंग देण्यात आले आहेत.
Google Pixel 11 Series | Google Pixel Watch 5 ची किंमत काय?
फोल्डेबल श्रेणीतील Google Pixel 11 Pro Fold ची 16GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या एकमेव व्हेरियंटची किंमत 1,86,999 रुपये आहे. हा फोन फक्त ऑलिव्ह रंगात उपलब्ध असेल.
दुसरीकडे, Google Pixel Watch 5 ची 41mm आवृत्ती 42,900 रुपये, तर 45mm मॉडेल 45,900 रुपये किमतीत येते. 41mm घड्याळासाठी फॉग, कॅनियन, ऑलिव्ह आणि ऑब्सिडियन हे चार रंग आहेत. 45mm आवृत्ती मात्र फॉग, ऑलिव्ह आणि ऑब्सिडियन या तीन पर्यायांत मिळेल.






