ड्रग्ज प्रकरणात नवं नाव समोर; अखेर पोलिसांनी शोध लावला

On: October 22, 2023 9:14 AM
---Advertisement---

पुणे | ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी आता तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. रहीम अन्सारीला पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

रहीम अन्सारीच्या चौकशी दरम्यान मोठी माहिती समोर आली. रहीम अन्सारी याकडे ड्रग्स तस्करीची मोठी जबाबदारी होती. अरविंद लोहारे हा ललित पाटील सोबत 2020 मध्ये येरवडा कारगृहात ड्रग्सची तस्करीमध्ये अटक होता. अरविंद लोहारे हा केमिकल इंजिनीयर होता. त्याला ड्रग्स बनवण्याचा फॉर्म्युला माहित होता.

हा फॉर्म्युला भूषण पाटीलपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने मोठी युक्ती लढवली. तारखेला भेटण्यासाठी भूषण पाटील सोबत अभिषेक बलकवडे येत होता. यादरम्यान किंवा फोनद्वारे ड्रग्स बनवायचा फॉर्म्युला भूषण पाटील पर्यंत पोहचला होता

रिहान अन्सारीकडे ड्रग्ज पोहोचवण्याची जबाबदारी दिली गेली होती. नाशिक येथून रहीम ड्रग्स राज्यभरात पोचवत असायचा, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now