Gas cylinder rules | जागतिक परिस्थितीचा परिणाम भारतातील इंधन व्यवस्थेवरही दिसून येत आहे. विशेषतः गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर त्याचा प्रभाव पडल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी गॅस मिळण्यात उशीर होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने गॅस बुकिंग आणि वितरणासंदर्भात काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत.
गॅस सिलिंडर दरवाढ आणि बुकिंगमधील नवे नियम :
अलीकडील आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. (Iran) आणि (Israel) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम अनेक देशांप्रमाणे भारतावरही झाला आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने 7 मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे सात टक्क्यांची वाढ केली असून 14.2 किलो वजनाचा सिलिंडर आता सुमारे 965 रुपयांना मिळत आहे. (Gas cylinder rules)
दरवाढीबरोबरच गॅस बुकिंगच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार ग्राहकांनी एकदा गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर लगेच दुसरा सिलिंडर मागवता येणार नाही. पुढील सिलिंडरची बुकिंग करण्यासाठी किमान 25 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी हा कालावधी अधिक ठेवण्यात आला असून तेथे दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी सुमारे 45 दिवसांचा अंतर ठेवण्यात आले आहे.
Gas cylinder rules | पुरवठा नियंत्रण आणि नवीन अटी :
सरकारने गॅस वितरण अधिक व्यवस्थित करण्यासाठी आणखी काही अटी लागू केल्या आहेत. बुकिंग केल्यानंतर गॅस सिलिंडर साधारणपणे सुमारे दोन ते अडीच दिवसांच्या आत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. तसेच एका ग्राहकाला वर्षभरात जास्तीत जास्त 15 सिलिंडर बुक करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. (LPG price increase)
याशिवाय (PNG) म्हणजेच पाईप्ड नॅचरल गॅस वापरणाऱ्या घरांबाबतही नवा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या घरांमध्ये आधीपासून पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे, त्या घरांना एलपीजी गॅस सिलिंडर देण्यात येणार नाही. या उपाययोजनांचा उद्देश म्हणजे सर्व ग्राहकांना गॅसचा पुरवठा समान पद्धतीने मिळावा आणि सिलिंडरचा काळाबाजार रोखता यावा. त्यामुळे नागरिकांनी या नव्या नियमांची माहिती घेऊन गॅस बुकिंगचे नियोजन करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.






