१ मेपासून बदलणार ६ महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

On: April 30, 2025 10:27 AM
Financial Rule Change
---Advertisement---

New Rules | प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच काही नवे नियम लागू होतात आणि यंदाच्या १ मेपासून देशभरात काही महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत. हे नियम बँकिंग, रेल्वे, एलपीजी गॅस, एफडी व्याजदर तसेच ग्रामीण बँकांच्या विलिनीकरणाशी संबंधित आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. (1 May New Rules)

रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार आता एटीएममधून मोफत व्यवहार मर्यादा ओलांडल्यास जास्त शुल्क आकारले जाणार आहे. एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क १७ रुपयांवरून १९ रुपये करण्यात आले आहे, तर बँलेन्स चेक करण्यासाठी ७ रुपये आकारले जातील. त्यामुळे नागरिकांनी व्यवहार करताना अधिक सजग राहण्याची गरज आहे.

रेल्वे आणि गॅस सिलेंडर दरात बदल :

रेल्वे विभागाकडून देखील तिकीट बुकिंगच्या नियमांत मोठा बदल करण्यात आला आहे. १ मेपासून स्लीपर व एसी कोचसाठी वेटिंग तिकिटे ग्राह्य धरली जाणार नाहीत. वेटिंग तिकिट फक्त जनरल डब्यांसाठीच वैध राहणार आहे. तसेच अॅडव्हान्स बुकिंग कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणण्यात आला आहे. (1 May New Rules)

याच तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे. दरमहा पहिल्या दिवशी गॅस दरात होणारे बदल सामान्य ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम करतात. यावेळी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात बदल होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

New Rules | एफडी, सेव्हिंग रेट्स आणि बँक विलिनीकरणाचे नियम लागू :

१ मेपासून काही बँका त्यांच्या एफडी (मुदत ठेवी) आणि सेव्हिंग अकाउंटवरील व्याजदरांमध्ये बदल करू शकतात. त्यामुळे ज्यांचे पैसे बँकेत गुंतवले आहेत त्यांनी या दरांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या बदलामुळे मिळणाऱ्या व्याजात वाढ किंवा घट होऊ शकते. (New Rules)

त्याचबरोबर ११ राज्यांतील ग्रामीण बँकांचे विलिनीकरण होण्याची शक्यता आहे. ‘एक राज्य, एक आरआरबी’ अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये ही योजना लागू होऊ शकते. यामुळे या बँकांच्या ग्राहकांना काही सेवा प्रक्रियेत बदल जाणवू शकतो.

News Title: New Financial Rules from May 1: Bank Charges, Railway Bookings, Gas Prices to Change

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now