घराणेशाहीत भाजपचा पहिला नंबर, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर आहेत ‘हे’ पक्ष!

On: April 8, 2024 9:49 PM
BJP
---Advertisement---

Nepotism | भाजपने काँग्रेसला घराणेशाही (Nepotism) वरून अनेकदा टार्गेट केलं होतं. मात्र आता भाजपच घराणेशाहीमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचं बोललं जात आहे. देशामध्ये भाजपच घराणेशाहीमध्ये अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीत तिकीट देण्याबाबत भाजप प्रथम क्रमांकावर असून शिंदे आणि काँग्रेस संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपने घराणेशाहीचा (Nepotism) विरोध केला होता. मात्र आता भाजपमध्ये अधिक घराणेशाही (Nepotism) दिसून येत आहे.

भाजप घराणेशाहीत पहिल्या स्थानावर

घराणेशाहीला मतदार पाठिंबा देतील की त्यांना धडा शिकवतील ही येणारी वेळच सांगेल. भाजपकडून डॉ. भारती पवार, डॉ. हिना गावित, पंकजा मुंडे, नवनीत राणा, रक्षा खडसे, पियूष गोयल, स्मिता वाघ, सुजय विखे पाटील, अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीये . महाराष्ट्राचे निवडणुकीतील 9 उमेदवार हे घराणेशाहीचं (Nepotism) प्रतिनिधित्व करणारे आहेत.

पंकजा मुंडे या माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहे. तर माजी मंत्री ए.टी यांच्या डॉ. भारती पवार सून आहेत. राज्याचे आदिवासी विकासमंत्री विजय कुमार गावित यांची कन्या हिना गावित आहेत. नवनीत राणा या रवी राणा यांच्या पत्नी आहेत. तर पियूष गोयल यांचे वडील हे वाजपेयी यांच्या सरकारमध्ये होते. रक्षा खडसे या आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. अनुप धोत्रे हे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील आहेत. (Nepotism)

दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस

काँग्रेसने देखील घराणेशाहीला आपलंसं केलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे लोकसभेला सामोरं जात आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, दिवंगत माजी खासदार बाळू धानोरे यांच्या पत्नी प्रतिभा धानोरे, दिवंगत आमदार यादवराव पाडोळे यांचे पुत्र प्रशांत पाडोळे आहेत.

शिवसेना पक्ष देखील घराणेशाहीमध्ये सामिल आहे. एका बाजूला उद्धव ठाकरेंवर टीका करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना हिंगोलीतून उमेदवारी मिळाली. धैर्यशील माने यांचे अजोबा बाळासाहेब माने सुद्धा खासदार राहिले आहेत. कोल्हापूरातून संजय मंडलिक हे देखील घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करतात.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये देखील बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार लढत आहेत. उस्मनाबादचे आमदार राणाजगतजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना देखील उमेदवारी देण्यात आली. तर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.

News Title – Nepotism BJP, Congress, NCP And Shivsena Shinde

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now