‘Rishi Kapoor महिलांसोबत वन नाईट स्टँड…’; नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा

On: December 14, 2023 11:59 AM
Rishi Kapoor
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री नीतू कपूर यांनी पती ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मोठा खुलासा केला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नीतू कपूर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नीतू कपूर यांचा धक्कादायक खुलासा

मी माझ्या पतीला 100 वेळा फ्लर्ट करताना पाहिलं आहे. पण लग्नानंतर इतर महिलांसोबत असलेलं प्रत्येक नातं ऋषी यांच्यासाठी वन नाईट स्टँड्स होते, असा धक्कादायक खुलासा नीतू कपूर यांनी केला आहे.

ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मला प्रचंड त्रास व्हायचा. आमची अनेकदा भांडणं देखील झाली. माझे मित्र इंटस्ट्रीमधील असल्यामुळे मला सतत फोन देखील यायचा. आउटडोर शूटिंग असायची तेव्हा ऋषी कपूर यांच्याबद्दल मला अनेक गोष्टी कळल्या होत्या, असं नीतू कपूर यांनी सांगितलं आहे.

“Rishi Kapoor यांना घरातून बाहेर काढलं असतं”

जर कोणत्या महिलेसोबत ऋषी कपूर यांचं नातं पुढे गेलं असतं, तर त्यांना घरातून बाहेर काढलं असतं, असं वक्तव्यही नीतू कपूर यांनी केलं आहे.

दरम्यान , मला कळून चुकलं होतं, की इतर महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये नसून फक्त वन नाईट स्टँड्स होते. ऋषी कपूर माझ्याशिवाय राहू शकत नव्हते, असं त्यांनी सांगितलं.

ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचा विवाह 22 जानेवारी 1980 रोजी झाला होता. दोघेही एका चित्रपटादरम्यान प्रेमात पडले होते. नीतू कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

महत्त्वाच्या बातम्या- 

Share Market | ‘या’ शेअरने दिला तिप्पट परतावा; गुंतवणूकदार मालामाल

Gautami Patil | ‘…आता भीती वाटते’; गौतमीने केला मोठा खुलासा

LIC वाल्यांना छप्परफाड कमाई, रिटर्न्सचे आकडे ऐकाल तर थक्क व्हाल

Viral Video | बीड येथील शिक्षकांचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सगळीकडे एकच खळबळ!

Deepika Padukone | रणबीर नाही-रणवीर नाही; दीपिकाला ‘या’ अभिनेत्यासोबत करायचं होतं लग्न

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now