Neena Gupta | ‘माझा एक्स बॉयफ्रेंड फुकटा होता, तो माझ्याकडे…’; नीना गुप्तांचा खुलासा

On: December 12, 2023 3:46 PM
Neena Gupta
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला पण स्वतःच्या बळावर त्या पुढे जात राहिल्या. त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही, असं त्या सांगतात.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. जेव्हा त्या एक्स बॉयफ्रेंडसोबत मुंबईत आल्या होत्या.

एका मुलाखतीत नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाविषयी सांगितलं. त्याचा उल्लेख करत त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत मुंबईत आल्यानंतर काय झालं याविषयी त्यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सुरूवातीच्या दिवसांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.

Neena Gupta यांचा खुलासा

एकट्याने पाऊल उचलण्याची हिंमत नसल्यामुळे नीना गुप्ता 1981 मध्ये आपल्या प्रियकरासह दिल्लीहून मुंबईत आल्या. मी मुंबईत आल्यावर पृथ्वी कॅफेमध्ये भरीत बनवायचे जेणेकरून मला तिथे मोफत जेवण मिळावं. मी माझ्या प्रियकरासोबत दिल्लीहून इथे आले कारण माझ्यात एकटी येण्याची हिंमत नव्हती.

“तो माझ्याकडे सिगारेटसाठी पैसे मागायचा”

त्यावेळी एक्स बॉयफ्रेंड मला लाज वाटू दे, तू मबंईला काय मेड बनायला आली आहेस का?, असे टोमणे मारायचा.  माझा एक्स बॉयफ्रेंड फुकटा होता. तो माझ्याकडे सिगारेटसाठी पैसे मागायचा. पण तरीही उलट तो असं काम करताना लाज वाटली पाहिजे असं मलाच म्हणायचा, असं नीना गुप्ता यांनी सांगितलं.

मी सगळ्यांना सांगितलं होतं, मला पैसे मागायला लाज वाटते, मला काम मागायला लाज वाटत नाही, असं नीना गुप्ता यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

BMC | शिंदे सरकारची मोठी खेळी; ठाकरे कुटुंब अडचणीत येणार?

Shivraj Singh Chouhan | ‘तुम्हीच सर्वांचे आवडते’; शिवराज सिंह चौहानांसमोर लाडक्या बहिणी ढसाढसा रडल्या

Gold Price Today | मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

Weather Update | राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावासाचा इशारा

Disha Salian | दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठी बातमी समोर!

Join WhatsApp Group

Join Now