शरद पवार गटाच्या वकिलांचा अत्यंत धक्कादायक दावा!

On: October 6, 2023 7:52 PM
---Advertisement---

मुंबई | महाराष्ट्रात विविध मुद्दयांवर राजकारण सुुरु आहे. सध्या नांदेड येथे झालेल्या रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा दिल्ली दौरा याच्या चर्चा सुुरु आहेत. तर दुसरीकडे आज दुपारी राष्ट्रवादी(NCP) कोणाची?, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होती. या सुनावाणीवर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

निवडणूक आयोगाकडून सुनावणी आज पार पडली, त्यावेळी शरद पवार(Sharad Pawar) गटाने अजित पवार(Ajit Pawar) गटाचे मुद्दे खोडून काढले. सुनावणी पार पडल्यानंतर शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी(Abhishek Manu Singhvi) यांनी काही मुद्दे मांंडले. माध्यमांशी बाेलत असताना ते म्हणाले की, “आमचं ऐकून घेतल्या शिवाय पक्षात वाद आहे हे सिद्ध करु नका”

“दुसऱ्या गटाचा युक्तिवाद संपेल तेव्हा आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळेल. कोणीही खोटे पुरावे देऊन पक्षावर दावा करु शकत नाही. आम्ही प्राथमिक पुरावे दिले आहेत. सुनावणी वेळी आणखी पुरावे देऊ, असं शरद पवार गटाच्या वकिलाने सांगितलं. दरम्यान, यामध्ये अजित पवार गटाने काही मृत व्यक्तींचे पुरावे व खोटी माहिती सादर केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या –

मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटलांविरोधात पोलीस तक्रार!

शरद पवारांचा मोठा डाव; अजित पवारांसह त्यांचे आमदार अडचणीत?

“अंधारेबाई संबंध नसताना नातवाला राजकारणात ओढाल तर…”

“…आता त्यांच्याच उरावर अजित पवार बसलेत”

‘गुवाहटी, गोव्याला जाऊन मौजमजा करण्यासाठी पैसे आहेत पण…’; उद्धव ठाकरे संतापले

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now