“जय भवानी, जय दुर्गा”, आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात!

On: September 22, 2025 9:18 AM
Navratri 2025
---Advertisement---

Navratri 2025 | आजपासून महाराष्ट्रात शारदीय नवरात्रोत्सवाची भव्य सुरुवात झाली आहे. राज्यभरातील मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होऊन वातावरण उत्सवी झाले आहे. मुंबई, पुणे, नांदेड, धाराशिवसह अनेक शहरांमध्ये मंदिरांची फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. भाविकांची मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून “जय भवानी, जय दुर्गा”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले आहे. (Navratri 2025)

पुण्यातील नवरात्र उत्साह :

पुण्यातील ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरासह विविध मंदिरांमध्ये पहाटेपासूनच घटस्थापना पार पडली. फुलांची सजावट, आकर्षक रंगरंगोटी आणि वीजरोषणाईमुळे संपूर्ण पुणे शहर नवरात्रमय झाले आहे. यंदा तिथीवृद्धीमुळे नवरात्र दहा दिवसांचे असून, २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. पुण्यातील श्री दुर्गामाता दौडीला देखील सुरुवात झाली असून, संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४१ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या (Tuljabhawani) शारदीय नवरात्र महोत्सवाची (Navratri 2025) आज धाराशिवमध्ये सुरुवात झाली. पहाटे सिंहासनावर देवी विराजमान झाल्यानंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापना झाली. नऊ दिवस देवीच्या विविध पूजा, विशेषतः भवानी तलवार अलंकार महापूजा, भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. देशभरातून तब्बल ५० लाख भाविक तुळजापुरात दर्शनासाठी येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Navratri 2025 | नांदेड, नाशिक आणि मुंबईतील सोहळे :

माहूरगडावर (Mahurgad) रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, नऊ दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सप्तशृंगी देवीच्या गडावरही मध्यरात्रीपासून भाविकांचा ओघ वाढला आहे. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत येथे यात्रा उत्सव साजरा होणार आहे.

मुंबईतील मुंबादेवी मंदिरात पहाटे मंगल आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. या काळात २१ पुजाऱ्यांमार्फत चंडीपाठ केला जाणार असून, सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

News Title: Navratri 2025 Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now