मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘या’ तारखेपासून सुरू होणार

On: February 28, 2025 4:02 PM
Purandar
---Advertisement---

Navi Mumbai International Airport l नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) देशातील पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात असून, ते आता प्रवासी सेवेसाठी सज्ज होत आहे. विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले असून, १७ एप्रिलपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याचे नियोजन आहे.

अधिकाऱ्यांकडून पाहणी :

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (Directorate General of Civil Aviation) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच विमानतळ प्रकल्पाला भेट देऊन, विमानतळाच्या तयारीचा आढावा घेतला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विमानतळाचा विकास करण्यात येत आहे.

यावेळी, विमानतळाची धावपट्टी, एप्रन, टॅक्सी वे, एटीसी टॉवर, टर्मिनल बिल्डिंग आणि बॅगेज हँडलिंग सिस्टीम यासारख्या सुविधांची तपासणी करण्यात आली. विमान कंपन्यांसाठी आवश्यक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंगची चाचणी देखील यशस्वी झाली आहे.

Navi Mumbai International Airport l मॉक चेक-इन प्रक्रिया :

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे संचालक फैज अहमद किडवई यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत विमानतळाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी विमानतळ सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

आढावा घेण्यासाठी आलेल्यांसाठी मॉक चेक-इन प्रक्रिया राबविण्यात आली. यात डमी बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅग जारी करण्यात आले. संयुक्त बैठकीत काही सुधारणा देखील सुचवण्यात आल्या. विमानतळ परिचालनाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा होता.

News title : Navi Mumbai International Airport Ready for Operations

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now