राजकारण तापलं! ‘या’ खासदाराच्या ताफ्यावर हल्ला; कारमधून बाहेर खेचून मारहाण

On: April 4, 2026 10:53 AM
Shashi Tharoor
---Advertisement---

Shashi Tharoor | खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील वांडूर परिसरात काही जणांनी थरूर यांच्या वाहनांचा ताफा अडवून गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. (Shashi Tharoor News)

ही घटना त्या वेळी घडली जेव्हा शशी थरूर हे प्रचारासाठी वांडूर भागात पोहोचले होते. स्थानिकांच्या माहितीनुसार, अचानक 10 ते 15 जणांचा जमाव रस्त्यावर जमला आणि त्यांनी ताफा थांबवला. काही जणांनी थरूर यांच्या कारच्या काचांवर हात मारत वाहन पुढे जाऊ दिले नाही. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

गनमॅनला बाहेर खेचून मारहाण :

ताफ्याला अडवण्यात आल्यानंतर सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी गनमॅन कारमधून खाली उतरले. त्यावेळी जमावातील काहींनी एका गनमॅनला कारमधून बाहेर खेचून त्याला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला. (Kerala Political News)

थरूर यांच्या टीमने हा प्रकार सुनियोजित हल्ला असल्याचा आरोप केला आहे. विरोधकांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अधिकृतपणे कोणत्याही पक्षाचे नाव समोर आलेले नाही.

Shashi Tharoor | पोलिसांकडून दोन जण ताब्यात :

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वांडूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. (Shashi Tharoor Convoy Attack)

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच स्थानिक नागरिकांचे जबाबही नोंदवले जात आहेत. हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते आणि हा जमाव स्थानिक होता की बाहेरून आणण्यात आला होता, याचा तपास सध्या सुरू आहे.

News Title: Congress MP Shashi Tharoor Convoy Attacked in Kerala, Gunman Assaulted by Mob

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now