काळजाचा थरकाप! कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; संपूर्ण परिसरात शोककळा

On: April 4, 2026 11:05 AM
Samruddhi Highway Accident
---Advertisement---

Dindori Accident News | दिंडोरी येथे शुक्रवारी उशिरा रात्री घडलेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळल्याने कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. विहीर खोल आणि पूर्णपणे पाण्याने भरलेली असल्याने कार थेट पाण्यात बुडाली आणि त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.

नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत :

प्राथमिक माहितीनुसार, MH15 JS 1053 क्रमांकाची कार दिंडोरीमार्गे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत जाऊन पडली. या भीषण अपघातात कारमधील सर्व 9 जणांचा मृत्यू झाला.

मृतांपैकी सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश असल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Dindori Accident News | मध्यरात्रीपर्यंत बचावकार्य सुरू :

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार, खोल पाणी आणि चिखल यामुळे बचावकार्य मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अखेर क्रेन आणि हायड्रा मशीनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली.

मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या या बचावकार्यात पहाटेपर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मृतांची नावे :

या भीषण अपघातात मृत झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

सुनिल दत्तू दरगोडे (34), रेश्मा सुनिल दरगोडे (29), आशा अनिल दरगोडे (32), सृष्टी अनिल दरगोडे (14), श्रेयस अनिल दरगोडे (11), श्रावणी अनिल दरगोडे (11), समृद्धी राजेंद्र दरगोडे (7), श्रद्धा अनिल दरगोडे (13) आणि गुणवंती सुनिल दरगोडे (10).

या हृदयद्रावक घटनेमुळे इंदोरे गावात शोककळा पसरली असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरींबाबत सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

News Title: Horrific Accident in Dindori Nashik: Car Falls into Water-Filled Well, 9 People Killed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now