५८ पॉर्न व्हिडीओ अन् बरच काही; नेत्यांसह सेलिब्रिटींच भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाचे काळे कारनामे उघड!

On: March 18, 2026 3:02 PM
Ashok Kharat Property
---Advertisement---

Ashok Kharat Arrested | नाशिकमध्ये एका धक्कादायक प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःला ज्योतिष आणि कॉस्मोलॉजी तज्ज्ञ म्हणवणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) याला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान त्याच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने हनी-ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचा संशय व्यक्त केला जात आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर उघडकीस आले धक्कादायक प्रकार :

नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाणे (Sarkarwada Police Station, Nashik) येथे 35 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली. पीडित महिलेच्या आरोपानुसार, अशोक खरात (Ashok Kharat) याने तिच्यावर बलात्कार केला. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि आरोपीच्या कार्यालयाची झडती घेतली. (Ashok Kharat Arrested)

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले. आरोपीच्या कार्यालयातून सीसीटीव्ही फुटेज आणि एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आली. या पेन ड्राइव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये अनेक महिलांचे तसेच काही प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ashok Kharat Arrested | कार्यालयात गुप्त कॅमेरे लावल्याचा संशय :

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात (Ashok Kharat) याने आपल्या कार्यालयात गुप्तपणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. संशय असा व्यक्त केला जात आहे की, महिलांना भविष्याची भीती दाखवून किंवा विविध प्रलोभन देऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले जात असे.

त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे. या व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेलिंगचे जाळे उभे केले होते का, याचा तपास आता नाशिक क्राइम ब्रांच (Nashik Crime Branch) करत आहे. या प्रकरणामुळे अनेक प्रभावशाली व्यक्तींमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले जात आहे.

कोण आहे अशोक खरात? :

अशोक खरात (Ashok Kharat) स्वतःला कॉस्मोलॉजी आणि ज्योतिषशास्त्राचा तज्ज्ञ असल्याचा दावा करत होता. त्याने मर्चंट नेव्हीमध्ये (Merchant Navy) अनेक वर्षे काम केल्याचा दावा केला असून 22 वर्षे विविध देशांमध्ये सेवा दिल्याचे तो सांगत होता.

निवृत्तीनंतर त्याने ब्रह्मांडाच्या रचनेचा अभ्यास केल्याचा दावा करत ज्योतिष क्षेत्रात प्रवेश केला. तसेच तो ‘शिवनिका ट्रस्ट’ (Shivnika Trust) या संस्थेचा प्रमुख असून ईशानेश्वर मंदिराच्या व्यवस्थापनातही त्याची भूमिका असल्याचे सांगितले जाते. सध्या पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

News Title: Nashik Shocked: Self-Proclaimed Astrologer Ashok Kharat Arrested, 58 Objectionable Videos Recovered

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now