“तुझ्या बापाचं काय जातंय?”, उद्धव ठाकरेंचा सरकारवर संतप्त हल्लाबोल

On: April 16, 2025 7:40 PM
BMC Election 2026
---Advertisement---

Nashik News | नाशिकमध्ये झालेल्या एका जाहीर मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तुफान टीकास्त्र सोडलं आहे. महायुती सरकारच्या महिलांविषय आणि शेतकरी (Farmers) धोरणांची खुली झोड घेताना, त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या विधानांचाही खरपूस समाचार घेतला आहे.

खोट्या वचनांवर मते मागितलीत तरी का?”

उद्धव ठाकरे म्हणाले, “महायुतीने निवडणुकीत डोळे दिपवणारी आश्वासनं दिली होती. माताभगिनींना दरमहिना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. पण आता फक्त 500 रुपयेच मिळणार असं सांगतायत. मग महिलांना अशा खोट्या वचनांवर मते मागितलीत तरी का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर टीका करताना, “ते सांगत होते की 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मनो किसान योजनेचे पैसे जमा होतील. पण आज 16 एप्रिल झाली, अजून पैसे आलेले नाहीत. हे खोटं बोलून शेतकऱ्यांची फसवणूक नाही का?” अशी विचारणा त्यांनी केली.

मी मेलो तरी हिंदुत्त्व सोडणार नाही-

ठाकरेंनी कोकाटेंच्या (Nashik News)  वादग्रस्त वक्तव्यावरही निशाणा साधला. “कर्जमाफी कशाला हवी, लग्न करायला का?” असं कोकाटेंनी म्हटलं होतं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकरी आत्महत्या करतोय, शेतीसाठी कर्ज घेतोय, तुमच्या बापाचं काय जातंय? शेतकऱ्यांची अशी चेष्टा करणाऱ्या मंत्र्यांनी एकदाही त्याच्या घरचा दरवाजा ठोठावला का?” असा थेट हल्ला त्यांनी केला.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले (Nashik News), “मी भाजपाला सोडलं, हिंदुत्व नाही. मी मेलो तरी हिंदुत्व सोडणार नाही. आमचं हिंदुत्व हे संकुचित नाही. आम्ही उघडपणे बोलतो, आमचं मन स्वच्छ आहे. कोणाची सावली पडली म्हणून आम्ही बदललो असं म्हणणं हास्यास्पद आहे.”

या आक्रमक भाषणातून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर तीव्र टीकेची झोड उठवली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भाषणाने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा चांगलेच तापले आहे.

Title : nashik news Uddhav Thackeray attack on the government 

Join WhatsApp Group

Join Now