मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीचा आकडा समोर

On: November 28, 2023 6:51 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 2014 पासून ते आतापर्यंत पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत आहेत. अशात त्यांच्या संपत्तीबद्दल किंवा त्यांना पगार किती मिळतो? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आलाच असेल. अशात पीएमओ ऑफिसने याबाबत एक माहिती शेअर केली होती आणि त्यानुसार भारताच्या पंतप्रधानांचा पगार हा एका वर्षाला वीस लाख रुपये इतका आहे.

Narendra Modi’s wealth declared

नरेंद्र मोदींकडे सध्या कोणताही जीवन विमा नाही. मोदींकडे आता कोणतीही जीवन विमा पॉलिसी नाही. त्यांच्या विमा पॉलिसीची मुदत संपलेली असून माध्यमातून जे पैसे मिळाले होते, ते त्यांनी फिक्स डिपॉझिट खात्यात ठेवले आहेत.

नरेंद्र मोदींची संपत्ती किती?

नव्या घोषणेनुसार त्यांच्या संपत्तीमध्ये एक एफडी आणि एक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र याचा समावेश आहे. या वर्षाच्या मार्चपर्यंत त्यांच्याकडे एसबीआयच्या गांधीनगर शाखेत एफडी खात्यात 2.47 कोटी रुपये होते. मागील वर्षात एफडी खात्यात 37 लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती आहे.

पीएम मोदी यांच्याकडून केलेल्या घोषणेनुसार त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. पंतप्रधान मोदींच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातही 14, 500 रुपयांची वृद्धी झाली आहे. 31 मार्च 2023 रोजी त्यांच्या एनएससीची किंमत 9. 19 लाख रुपये होती.

नरेंद्र मोदी वेतनाची रक्कम करतात दान 

पंतप्रधान मोदी कोणतेही वेतन घेत नाही. ते वेतनाची संपूर्ण रक्कम दान करतात. त्यांच्याकडे केवळ एकच बँक खाते आहे. जे गांधीनगरमधील एसबीआय शाखेत आहे. हे बँक खाते ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून आहेत. मोदींनी त्यांच्या वाट्याचा हिस्सा दान करून दिल्याची माहिती आहे. दुसरं महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे म्युच्युअल फंड किंवा शेअर्स किंवा बॉण्ड इत्यादी मध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Uttarkashi Tunnel Rescue | ‘ती’ एक गोष्ट ठरली वरदान; उत्तरकाशीतून मोठी अपडेट समोर

Pune Crime | माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य; मुक्या जीवावर गोळीबार

“6 डिसेंबरनंतर देशात कधीही काहीही होऊ शकतं”; ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Manoj Jarange Patil यांनी घेतली माघार; केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

Skin Care | चेहऱ्यावर Beer लावल्याने होतात ‘हे’ फायदे

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now