“मोफत वस्तूंनी नाही, तर…”; देशातील गरिबीवर नारायण मूर्तींचं वक्तव्य चर्चेत

On: March 13, 2025 12:16 PM
Narayana Murthy on india Poverty
---Advertisement---

Narayana Murthy | इन्फोसिसचे (Infosys) सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी ‘टायकॉन मुंबई-2025’ (TiEcon Mumbai-2025) कार्यक्रमात बोलताना गरिबी निर्मूलनावर आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “देशातील गरिबी मोफत वस्तू वाटून नाही, तर नाविन्यपूर्ण उद्योजकांच्या (Innovative Entrepreneurs) रोजगार निर्मितीमुळे (Job Creation) संपेल.”

उद्योजकांना आवाहन

नारायण मूर्ती यांनी उद्योजकांना अधिकाधिक कंपन्या आणि व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. “जर आपण नावीन्यपूर्ण उद्योग निर्माण करू शकलो, तर गरिबी सकाळच्या उन्हातील दवाप्रमाणे नाहीशी होईल,” असे ते म्हणाले. “तुमच्यापैकी प्रत्येकजण शेकडो, हजारो रोजगार तयार करून गरिबीची समस्या सोडवू शकता. मोफत वस्तू देऊन गरिबी हटवता येत नाही आणि कोणताही देश यात यशस्वी झालेला नाही,” असेही ते म्हणाले.

नारायण मूर्ती यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा देशात मोफत वस्तू आणि त्यांच्या किंमतींवरून चर्चा सुरू आहे. मूर्ती यांनी सांगितले की, त्यांना राजकारण किंवा प्रशासनाची फारशी माहिती नाही, परंतु त्यांनी धोरणात्मक चौकटीच्या दृष्टीकोनातून काही शिफारशी केल्या.

200 युनिट मोफत वीज

“फायद्याच्या बदल्यात परिस्थितीतील सुधारणांचे मूल्यमापन व्हायला हवे,” असे मूर्ती (Narayana Murthy) म्हणाले. दरमहा 200 युनिट मोफत विजेचे उदाहरण देत, त्यांनी सांगितले की, राज्य सरकार सहा महिन्यांनंतर अशा घरांमध्ये सर्वेक्षण करून मुले अधिक शिकत आहेत की नाही, हे तपासू शकतात.

“सध्या विकले जाणारे बहुतेक एआय (AI) सोल्यूशन्स जुने प्रोग्राम आहेत. एआयमध्ये मशीन लर्निंग (Machine Learning) आणि डीप लर्निंग (Deep Learning) क्षमतांचा समावेश आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

Title : Narayana Murthy on india Poverty

 

Join WhatsApp Group

Join Now