Narayan Rane | रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधामध्ये ठाकरे शिवसेना गटाचे नेते विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. काही दिवसांआधी विनायक राऊत यांनी मी अडीच लाख मतांनी विजयी होणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. तर आता नारायण राणे (Narayan Rane) यांनी मी 3 लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा केलाय.
मनसे पक्ष आता नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचाराला रस्त्यावर उतरला आहे. ते कणकवली येथे नारायण राणे यांच्यासाठी प्रचार सभा आयोजित करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, मंत्री उदय सामंत राणेंच्या प्रचारासाठी पुढे सरसावले आहेत. येथून माझा विजय निश्चित असल्याचं राणे म्हणालेत. यावेळी भाजपा, महायुती किती जागा जिंकेल यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी आपल्या विजयावर भाष्य केलंय. (Narayan Rane)
“मी 3 लाख मतांनी विजयी होणार”
नारायण राणे (Narayan Rane) हे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपल्या विजयावर आणि महायुतीच्या विजयावर भाष्य केलं आहे. ते सध्या गावात, वस्तीत जात भेटी देताना दिसत आहेत. मी 3 लाखांनी विजयी होणार असल्याचं ते म्हणालेत. मी राज्यसभेत खासदार आणि केंद्रात मंत्री आहे. मी एकतर्फी विजय मिळवेल, असं नारायण राणे म्हणालेत.
“महायुती 38 ते 40 जागांवर विजय मिळवेल”
मी 3 लाख मताधिक्यांनी विजयी होईल तर महायुती 38 ते 40 जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. सध्या नारायण राणे यांनी स्थानिक विषयावर भाष्य केलं आहे. पुराचा प्रश्न, पाण्याची समस्या, नोकरीची समस्या पुढील 1 वर्षात हे प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन राणे यांनी दिलं आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ठाकरे गटातून विनायक राऊत निवडणूक लढवतील. तर भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आलीये. काही दिवसांआधी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची सभा पार पडली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर शाब्दिक टोला लगावला. भाजपने त्यांना लघु आणि सुक्ष्म त्यांच्याप्रमाणेच खातं दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेले.
दरम्यान, मतदानादिवशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूनं कौल देणार ही येणारी वेळ सांगेल. दरम्यान काही दिवसांआधी भाजप नेते नितेश राणे यांनी मतदारसंघातील काही सरपंचांना जर लीड मिळाली नाहीतर निधी मिळणार नसल्याचा सज्जड दम नितेश राणे यांनी दिला होता.
News Title – Narayan Rane Say I Will Be Elected By 3 Lakhs Lead At Ratnagiri Sindhudurg Loksabha
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर- मुरलीधर मोहोळ
“थोडं कमी पीत जा”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ तूफान व्हायरल
“आता सभा घेऊन कोणाची पोरं खेळवणार?”
“आमच्या डोक्यात प्रकाश पडायला…”, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार
अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला, शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी जाहीर






