नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा आला समोर

On: April 21, 2024 8:51 PM
Narayan Rane
---Advertisement---

मुंबई | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नारायण राणे (Narayan Rane) पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राणे यांची 137 कोटींची संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे.

नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार

नारायण राणे (Narayan Rane) यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात राणेंकडे 137 कोटींची मालमत्ता असल्याचं आढळून आलं आहे. राणे हे राज्यसभेसाठी सहा वर्षापूर्वी उमेदवारी दाखल करणाऱ्या सात उमेदवारांपैकी सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

राणे यांच्या पत्नी निलम राणे यांच्याकडे 75 कोटींची संपत्ती आहे. राणे कुटुंबीयांवर 28 कोटीहून अधिक कर्ज असल्याचंही त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झालं आहे.

राणेंची एकूण संपत्ती जाहीर

शपथपत्रामध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार वार्षिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 49 लाख 53 हजार 207 रुपये आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 87 लाख 73 हजार 883 रुपये आहे. कौटुंबिक उत्पन्न 15 लाख 7 हजार 380 रुपये आहे. नारायण राणे यांच्याकडे एक कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने, तर 78 लाख 85 हजार 371 रुपयांचे डायमंड आहेत.

नीलम राणे (Narayan Rane) यांच्याकडे एक कोटी 31 लाख 37 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅम वजनाचे सोने आहे. 15 लाख 38 हजार 572 रुपयांचे डायमंड आणि 9 लाख 31 हजार 200 रुपयांची चांदी आहे. सोने-चांदी डायमंड असे करून कुटुंबाकडे 9 कोटी 31 लाख 66 हजार 631 रुपयांचा किमती एवज आहे.

दरम्यान, सहा वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सात उमेदवारांमध्ये नारायण राणे (Narayan Rane) सर्वात श्रीमंत उमेदवार होते. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात 88 कोटींची संपत्ती असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे गेल्या सहा वर्षात त्यामध्ये 49 कोटींची वाढ झाली आहे.

News Title- Narayan Rane is the richest candidate

महत्त्वाच्या बातम्या- 

‘छत्रपती शिवरायांची क्षमा मागून…’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

उष्माघाताची बातमी वाचताना अँकर स्वतःच कोसळली, Video होतोय व्हायरल

खडसेंच्या भाजप प्रवेशावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘इच्छा नसतानाही…’

“…म्हणून फडणवीसांचे पंख छाटण्यात आले अन् त्यांना उपमुख्यमंत्री केलं”

‘रश्मी ठाकरे फक्त दिसतात भोळ्या त्या…’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now