“उद्धव ठाकरे हा महाफडतूस माणूस आहे”

On: April 5, 2023 6:11 PM
---Advertisement---

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा महाफडतूस माणूस आहे, अशी घणाघाती टीका नारायण राणेंनी केली आहे.

नारायण राणेंनी (Narayan Rane) मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीये.

काही राज्यांमध्ये अशी पद्धत आहे की घरात माणूस गेला की रडायला माणसं बोलवतात. रूदाली असं त्यांना संबोधलं जातं. त्यांना कशाचंही सोयर-सुतक नसतं. पैसे मिळाले की ते रडतात. उद्धव ठाकरे हा तसलाच माणूस आहे. कुणाचंही काही झालं की तिथे पळायचं, पत्नीला आणि मुलाला घेऊन आणि लागतो रडायला, अशी टीका राणेंनी केलीये.

मोले घातले रडाया नाही असूं आणि माया, असं म्हणत अडीच वर्षात भरपूर मोल कमावलं आहे आता रडायचं काम बाकी आहे. त्या आसवांमध्ये मायाही नाही प्रेमही नाही असा हा उद्धव ठाकरे आहे, असं राणे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now