7 year girl assault case | नांदेड शहरात घडलेल्या एक धक्कादायक घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या सात वर्षांच्या मुलीवर तिच्याच शिक्षकाने अत्याचार (Teacher Arrested Sexual Abuse) केल्याची घटना उघड झाली आहे. 19 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकरणामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. (Nanded Crime News)
मुलीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघड झाली. मुलगी सतत शाळेत जाण्यास नकार देत असल्याने आईने तिच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. तातडीने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. (7 year girl assault case)
फास्टट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी :
या प्रकरणाची गंभीरता पाहता नांदेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी या खटल्याची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होण्यासाठी न्यायालयात प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये न्याय मिळवण्यासाठी विलंब होऊ नये, यासाठी जलद न्यायालयीन प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांवर विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवत असतात. मात्र सुरक्षा असावी अशी अपेक्षा असताना शिक्षकाकडूनच अशा प्रकारचा घृणास्पद कृत्य झाल्याने शहरातील पालकांमध्ये भीती आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक पडताळणी प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
7 year girl assault case | समाजात संताप; कठोर शिक्षेची मागणी :
नांदेडसारख्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहरात घडलेल्या या घटनेने नागरिक आक्रोशित झाले आहेत. स्थानिक नागरिक, पालक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. समाजाने अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कायदे आणि अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. (7 year girl assault case)
बालकांवरील अत्याचार ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजाची समस्या आहे. अशा घटना टाळण्यासाठी घर, शाळा आणि समाज या तिन्ही स्तरांवर जबाबदारीने आणि सजगतेने वागण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत, हीच सर्वांची अपेक्षा आहे.






