महाराष्ट्र हादरला! … म्हणून तरुणाची गोळ्या झाडून व दगडाने ठेचून केली हत्या

On: November 28, 2025 10:55 AM
Nanded Crime (1)
---Advertisement---

Love Affair Murder | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी घटनांची मालिका वाढतच चालली आहे. खून, दरोडा, विनयभंग, बलात्कार अशा गंभीर घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात घडलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे. प्रेमसंबंधातून वाद निर्माण झाल्याने एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. (Love Affair Murder)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडच्या (Nanded Crime) इतवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्षम तोटे या तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेत प्रथम त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला. या दुहेरी हल्ल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळ पाहिले तेव्हा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गोळ्या झाडून नंतर दगडाने ठेचून हत्या; आरोपी अल्पावधीत जेरबंद :

ही भयानक घटना नांदेड शहरातील मिलिंद नगर भागातील पैलवान टी हाऊसच्या पाठीमागे घडल्याचे समोर आले आहे. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान खून करणारे दोन्ही आरोपी मिळून आले असून पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास वेगाने उलगडण्याची शक्यता आहे.

मृत सक्षम तोटे आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते, अशी माहितीही पुढे आली आहे. मृत तरुण आणि आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे आरोपी पळ काढू शकले नाहीत. त्यांना बेड्या ठोकून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

Love Affair Murder | प्रेमसंबंधातून वाद; हत्येचं नेमकं कारण अजूनही अस्पष्ट :

या खूनाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सक्षम तोटे (Saksham tote) याला का मारण्यात आले, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणामागे कोणते वैयक्तिक किंवा भावनिक कारणे दडलेली होती, याचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्ह्याशी संबंधित पुरावे गोळा केले जात आहेत. या प्रकरणातील सर्व कोन तपासले जात असून प्रेमसंबंध, वाद, गुन्हेगारी पार्श्वभूमी यावर लक्ष केंद्रीत केले आहे. नांदेडसारख्या शांत शहरात घडलेली ही हृदयद्रावक घटना सर्वांना हादरवून सोडत आहे. पुढील काही तासांत या प्रकरणातील महत्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.

News Title: Nanded Murder Shocks Maharashtra: Youth Shot and Bludgeoned Over Love Affair Dispute

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now